ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज स्टिव्ह स्मिथने एक वर्षांच्या बंदी नंतर इंग्लंड विरुद्ध सुरु असलेल्या ऍशेस मालिकेतून कसोटीमध्ये दमदार पुनरागमन केले आहे. त्याने पहिल्या ऍशेस सामन्यात दोन्ही डावात शतके करण्याचा पराक्रम केला आहे.
पण स्मिथ सध्या फक्त मैदानातच नाही तर मैदानाबाहेरही चांगल्या फॉर्ममध्ये आहे. त्याने 2015मध्ये कोएला मॅट्रेस(गाद्या बनवणारी कंपनी)मध्ये 1 मिलियन डॉलर्सची गुंतवणूक केली होती. ऑस्ट्रेलियन फायनांशियल रिव्ह्यू नुसार आता स्मिथला या गुंतवणूकीतून 12.1 मिलियन डॉलर एवढा नफा मिळत आहे.
स्मिथने ऑस्ट्रेलिया संघाचा कसोटी कर्णधार बनण्याआधी जूलै 2015मध्ये कंपनीच्या 10 टक्के गुंतवणूक केली होती. आता या कंपनीची ग्राहक संख्या 2 लाख झाली असून या कंपनीची किंमत 150 मिलियन डॉलर इतकी झाली आहे.
या कंपनीचे सहसंस्थापक मिच टेलर म्हणाले, ‘मला अजूनही लक्षात आहे जेव्हा स्मिथ कंपनीमध्ये गुंतवणूक करत होता तेव्हा मी त्याच्या व्यवस्थापकाला आणि पालकांना असे होऊ शकते, असे सांगितले होते.’
स्मिथ या कंपनीचा ब्रँड अँबेसिडर देखील आहे. स्मिथला त्याच्या कमाईतील मोठा हिस्सा या कपंनीत केलेल्या गुंतवणूकीच्या नफ्यातून मिळतो. तसेच स्मिथने ऑनलाईन फोटो प्लॅटफॉर्म स्नॅपरमध्येही गुंतवणूक केली असल्याचे वृत्त आहे पण याबद्दल अधिक माहिती उपलब्ध नाही.
या बरोबरच स्मिथला क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडून वार्षिक कराराचे तसेच आयपीएलमधूनही करोडो रुपये मिळतात.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –
–२६ धावा करताच या खास यादीत रोहित शर्मा टाकणार युवराज सिंगला मागे
–विंडीज विरुद्धच्या तिसऱ्या वनडे सामन्यासाठी अशी आहे ११ जणांची टीम इंडीया
–इंग्लंडला पराभूत करत टीम इंडिया ठरली चॅम्पियन!