भारत आणि ऑस्ट्रेलिया संघादरम्यानच्या कसोटी मालिकेतील तिसरा सामना गुरुवारपासून(7 जानेवारी) सिडनी क्रिकेट ग्राउंडवर सुरू झाला आहे. सिडनीमध्ये हा सामना सुरू होण्यापूर्वी स्टीव स्मिथचा एक व्हिडीओ समोर आला असून, त्यामध्ये तो आपल्या हॉटेल रूममध्ये फलंदाजीचा सराव करताना दिसून येत आहे. स्मिथची पत्नी डॅनी विलिसने हा व्हिडिओ शेयर केला आहे.
स्मिथ या व्हिडिओमध्ये ऑस्ट्रेलियची कसोटी जर्सी घालून फलंदाजीचा सराव करताना दिसून येतोय. स्मिथला फलंदाजीची असलेली आवड सर्वश्रुत आहे. स्मिथ जेव्हा नेटमध्ये फलंदाजी करत असतो, तेव्हा इतर खेळाडूंना त्याला मोठ्या कष्टाने नेट्सच्या बाहेर आणावे लागते. तसेच तो नेहमी शाडो बॅटींग (काल्पनिक चेंडूला बॅटने मारण्याचा प्रयत्न) करताना दिसतो. ज्याचा त्याला नेहमीच फायदा झाला आहे.
आता स्मिथचा हॉटेलरुममध्ये सरावचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. याबरोबरच यावरुन असेही दिसते की स्मिथची धावा करण्याची भूक वाढली असून तो सिडनी कसोटीत चांगली कामगिरी करण्यास उत्सुक आहे.
Steve Smith is ready to go 😂
(via Insta/steve_smith49) #AUSvIND pic.twitter.com/XM79FjFzg9
— 7Cricket (@7Cricket) January 6, 2021
खराब फॉर्मशी संघर्ष –
स्मिथ सध्या आपल्या कारकिर्दीमधील सर्वात खराब फॉर्ममध्ये आहे. मागील जवळ जवळ दीड वर्षापासून त्याने कसोटी शतक ठोकलेले नाही. स्मिथने या मालिकेत खेळलेल्या 4 डावात अनुक्रमे 1,1*, 0, व 8 धावा केलेल्या आहेत. मालिकेत दोन्ही संघ 1-1 ने बरोबरीत असल्यामुळे महत्त्वाच्या असलेल्या सिडनी कसोटी सामन्यात स्मिथकडून ऑस्ट्रेलियन समर्थकांना उत्तम कामगिरी अपेक्षा असणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
सिडनीच्या मैदानावर तब्बल ६ वर्षांनंतर वॉर्नरने केली ‘अशी’ कामगिरी
आनंदाची बातमी! सौरव गांगुलीला हॉस्पिटलमधून मिळाला डिस्चार्ज; घरी परतताना दिली ‘ही’ प्रतिक्रिया
AUS v IND : पुरुषांच्या कसोटी सामन्यात पहिल्यांदाच महिलेने केले अंपायरींग, सिडनीत रचला इतिहास