सध्या बांगलादेश येथे महिला आशिया चषक खेळला जात आहे. टी20 प्रकारातील या आशिया चषकात भारतीय संघाचा अखेरचा साखळी सामना थायलंडविरुद्ध झाला. भारतीय संघाने या सामन्यात नऊ गड्यांनी दणदणीत विजय मिळवत उपांत्य फेरीत प्रवेश केला. या विजयानंतर भारतीय महिला संघाची उपकर्णधार स्मृती मंधाना व जेमिमा रॉड्रिग्जने थायलंड संघाला मार्गदर्शन केले. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
भारतीय संघ हा महिला क्रिकेटमधील मातब्बर संघांपैकी एक मानला जातो. भारतीय खेळाडू जगभरातील अव्वल खेळाडूंच्या खांद्याला खांदा लावून खेळत असतात. आपला हाच अनुभव भारतीय संघाची उपकर्णधार स्मृती मंधाना आणि प्रमुख फलंदाज जेमिमा रॉड्रिग्जने आपले अनुभव थायलंडच्या खेळाडूंशी शेअर केले. स्मृती या व्हिडिओमध्ये आपण सामन्यासाठी कशाप्रकारे तयारी करतो. तसेच, फटक्यांची निवड कशी असते हे सांगताना दिसत आहे. आशिया क्रिकेट कौन्सिलच्या ट्विटर हँडलवरून हा व्हिडिओ शेअर केला गेला आहे.
Indian captain ????????, Smriti Mandhana, who played her 100th T20I, and Jemimah Rodrigues, share their experience with the Thailand players ????????. #INDvTHAI #WomensAsiaCup2022 #AsianCricketCouncil #ACC pic.twitter.com/JGScwmbT3W
— AsianCricketCouncil (@ACCMedia1) October 10, 2022
हा सामना स्मृतीसाठी विशेष होता. कारण, या सामन्यात ती भारतासाठी 100 टी20 सामने खेळणारी दुसरी महिला क्रिकेटपटू बनली. विशेष म्हणजे तिला या सामन्यात नेतृत्व करण्याची संधी देखील मिळाली होती. दुसरीकडे, थायलंडने स्पर्धेत सहा सामने खेळताना तीन विजय व तीन पराभव पत्करले.
स्पर्धेतील आपला अखेरचा साखळी सामना खेळत असलेल्या भारतीय संघाने या सामन्यात जबरदस्त कामगिरी केली. गोलंदाजांनी या सामन्यात अक्षरशावरचे स्वभाजपत थायलंडचा डाव अवघ्या 37 धावांवर संपुष्टात आणला होता. त्यानंतर भारताने अवघा एक गडी गमावत हे लक्ष पार केले. स्पर्धेच्या उपांत्य फेरीत भारताचा सामना श्रीलंका संघाशी होण्याची दाट शक्यता आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘भावा त्याने 700 गोल केलेत, रन नाही’, रोनाल्डोला शुभेच्छा देऊन युवराजने मारली स्वत:च्या पायावर कुऱ्हाड
‘काहीतरी करूनच ये, नाहीतर…’, शाहबाजच्या वडिलांनी दिली होती क्रिकेटपटूला ताकीद, आता सगळीकडं गाजतोय





