स्मृती मंधाना भारतीय महिला क्रिकेटचा चेहरा आहे. भारतासाठी सलामीला फलंदाजी करणारा स्मृती लवकरच रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाच्या चर्सीत दिसणार आहे. वुमेंस प्रीमियर लीग म्हणजेच डब्ल्यूपीएलमध्ये ती आरसीबीसाठी खेळेल. मागच्या वर्षीही डब्ल्यूपीएलचा पहिला हंगाम होता आणि स्मृती आरसीबीचा भाग होती. यावर्षी स्मृतीच्या नेतृत्वातील संघ मागच्या हंगामापेक्षा चांगले प्रदर्शन करण्याच्या प्रयत्नात असेल. तत्पूर्वी स्मृतीने स्वतः एक विक्रम सांगितला आहे, जो ती आपल्या नावावर करू इच्छिते.
डब्ल्यूपीएल 2024 (WPL 2024) सुरू होण्यासाठी अवघ्या काही दिवसांचा वेळ बाकी आहे. शुक्रवारी (23 फेब्रुवारी) डब्ल्यूलीएलच्या या दुसऱ्या हंगामाचा पहिला सामना दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात खेळला जाणार आहे. स्मृती मंधाना (Smriti Mandhana) हिच्या नेतृत्वातील आरसीबी संघ आपला पहिला सामना शनिवारी (24 फेब्रुवारी) यूपी वॉरिअर्स संघाविरुद्ध खेळेल. आरसीबीसाठी बोलताना स्मृतीने तो विक्रम सांगितला, जो कारकिर्दीच्या शेवटापर्यंत ती नावावर करू इच्छित आहे.
डब्ल्यूपीएल हंगाम सुरू होण्याआधी स्मृती मंधानाने दिलेल्या मुलाखतीत तिला रॅपिड फायर प्रश्न विचारले गेले. एकूण 18 प्रश्नांची उत्तरे तिने दिली. यादरम्यान तिला प्रश्न विचारला केला की, असा कोणता विक्रम आहे, जो तुला स्वतःच्या नावावर करावा वाटतो? या प्रश्नाचे उत्तर स्मृतीने दिले की, “माझी इच्छा आहे की, सर्वाधिक विश्वचषक जिंकण्याचा विक्रम माझ्या नावावर व्हावा.” स्मृतीला इतकांपेक्षा सर्वात जास्त विश्वचषक जिंकायचे आहेत. पण तिच्या नावावर अद्याप एकही विश्वचषक नाहीये.
स्मृतीने या मुलाखतीत आपल्या टोपण नावाचाही खुलासा केला. वडिलांना तिचे नाव बोलता येत नसल्यामुळे घरी तिला ‘बेबू’ या नावाने बोलले जाते. विराटविषयी प्रतिक्रिया देताना तिने रन मशीन असा उल्लेख केला. तसेच 2016 साली विराटने टी-20 विश्वचषकात ऑस्ट्रेलियाविरुद्ध केलेली 82 धावांची खेळी तिला सर्वात जास्त आवडली होती, असेही सांगितले. (Smriti Mandhana answered what her dream record would be)
महत्वाच्या बातम्या –
सचिनच्या जुन्या आठवणी झाल्या ताज्या, विमान प्रवासात ‘सचिन-सचिन’च्या घोषणा
आता रोखून दाखवा! आयपीएल कमबॅकसाठी रिषभ पंत रेडी, सराव सामन्यात पाडला धावांचा पाऊस