वुमेन्स प्रिमियर लीग च्या लिलावाच्या सुरुवातीलाच सर्वाधिक चर्चेत असलेल्या स्म्रिती मंधाना हिच्यावर बोली लावण्यात आली. सर्वच पाच फ्रँचायजीने बोली लावण्यात रस दाखवला. मात्र यात सर्व प्रतिस्पर्धी फ्रँचायजींना मागे टाकत रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु संघाने तब्बल 3 कोची 40 लाख मोजून स्म्रिती मंधाना या तडाखेबाज खेळाडूला आपल्या ताफ्यात घेतली आहे. ( Smriti Mandhana Becomes First Player To Be Sold In WPL Auction 2023 Goes To Bangalore For 3.40 CR )
Smriti Mandhana becomes the first player to be sold in the #WPLAuction. 🏏
She goes to Bangalore for 3.40 CR. pic.twitter.com/KvB6GnlVQV
— 100MB (@100MasterBlastr) February 13, 2023
महिला प्रीमियरचा लिलाव मुंबईत पार पडत आहे. यामध्ये एकूण 90 स्लॉट असून 409 खेळाडूंवर बोली लागणार आहे. मुंबई इंडियन्स, दिल्ली कॅपिटल्स, गुजरात जायंट्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु, यूपी वॉरियर्स असे पाच संघ या स्पर्धेत खेळणार आहेत. सर्व 5 फ्रँचायझींची पर्स ही 60 कोटी रुपयांची आहे. मलिका अडवाणी या लिलावाची जबाबदारी पार पाडत आहेत.
अधिक वाचा –
– मोठी बातमी! वर्ल्डकप विजेत्या कर्णधाराची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून तडकाफडकी निवृत्ती
– जेमिमाह रॉड्रिग्जने उचलला पंचांच्या चुकीचा पुरेपूर फायदा, पाकिस्तानने गमावला विश्वचषकातील पहिला सामना