Thursday, March 23, 2023
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मोठी बातमी! वर्ल्डकप विजेत्या कर्णधाराची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून तडकाफडकी निवृत्ती

मोठी बातमी! वर्ल्डकप विजेत्या कर्णधाराची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून तडकाफडकी निवृत्ती

February 13, 2023
in क्रिकेट, टॉप बातम्या
Virat Kohli Eoin Morgan

क्रिकेटजगतातून सोमवारी (13 फेब्रुवारी) मोठी बातमी समोर आली. इंग्लंडचा विश्वविजेता कर्णधार ऑयन माॅर्गन याने क्रिकेटच्या सर्व प्रकारांमधून निवृत्ती घोषित केली. क्रिकेटमधून निवृत्ती घोषित करण्याची ही सर्वात योग्य वेळ असल्याचे ऑयन माॅर्गनने यावेळी सांगितले. त्याच्या नेतृत्वात इंग्लंडने 2019 साली आयसीसी टी-20 विश्वचषक जिंकला होता.

ऑयन मॉर्गन (Eoin Morgan) आपल्या पोस्टमध्ये म्हणतो, “मी अतिशय अभिमानाने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेत आहे. गेली काही वर्ष मला क्रिकेटने खूप काही दिलं व आता मला हीच योग्य वाटते, जेव्हा मी क्रिकेटला अलविदा केलं पाहिजे. 2005 साली इंग्लंडमध्ये स्थायिक होण्यापासून ते एसए20 लीगमधील सामन्यापर्यंत मी सर्व क्षणांचा आनंद घेतला. प्रत्येक खेळाडूच्या कारकिर्दीत जीवनात चढ उतार येतात. माझ्याही आले परंतू या काळात माझे मित्र व परिवार कायम सोबत राहिला. कोणतीही अपेक्षा न ठेवता मला कायम पाठिंबा देणारी माझी पत्नी, परिवाराचे सदस्य व मित्रपरिवार यांचा मी आभारी आहे. याचबरोबर मी माझे प्रशिक्षक, टीममेट, चाहते व मला घडविण्यात ज्यांनी ज्यांनी मदत केली त्या सर्वांचे आभारी आहे. मी क्रिकेटचा आभारी आहे, ज्यामुळे मी जगभर फिरू शकलो व अतिशय चांगले मित्र जोडू शकलो. जगभरातील लीगमध्ये खेळल्यामुळे मला खूप आनंदाचे क्षण मिळाले, त्यांचाही मी आभारी आहे. मी निवृत्ती घेतली असल्यामुळे जवळच्या लोकांबरोबर मी वेळ घालवणार आहे व भविष्यात काय करता येईल याचा विचार करणार आहे. मी नक्कीच क्रिकेट खेळातील अनेक गोष्टी मीस करणार आहे. मी निवृत्ती घेत असलो तरीही खेळाशी जोडलेला असेल.”

pic.twitter.com/1x1w0unGL2

— Eoin Morgan (@Eoin16) February 13, 2023

जन्माने आयरिश असलेल्या ऑयन मॉर्गनने 16  कसोटी, 248 वनडे व  115 टी-20 सामने खेळले. यात तो काही आंतरराष्ट्रीय सामने इंग्लंड तर काही सामने आयर्लंड संघाकडून खेळला. वयाच्या 17व्या त्याची आयर्ल्ंडच्या अंडर 19 टीममध्ये निवड झाली होती तर दोन वर्षांनी तो या संघाचा कर्णधार झाला होता. 2006 साली आयर्लंडकडून वनडे पदार्पणात त्याने 99 धावा केल्या होत्या. पदार्पणात 99 धावांवर बाद होणारा तो जगातील एकमेव खेळाडू ठरला होता. Moggie या टोपणनावाने क्रिकेट जगतात ओळखला जाणारा मॉर्गन 2007 साली आयर्लंडक़डून विश्वचषक खेळला परंतू त्याला मोठी कामगिरी करता आली नाही. 2009 साली त्या इंग्लंडकडून मोठी संधी मिळाली व त्यानंतर तो थांबला नाही. (Breaking! England’s world-winning captain Eoin Morgan retires from all forms of cricket)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-

दिल्ली कसोटीआधी ऑस्ट्रेलिया पुन्हा अडचणीत, VCA कर्मचाऱ्यांनी फेरले पाहुण्या संघांच्या अपेक्षांवर ‘पाणी’
बॉर्डर गावसकर ट्रॉफीविषयी मोठी अपडेट, धरमशालातील तिसरा कसोटी सामन रद्द!


Next Post
Photo Courtesy: Twitter/ICC

व्वा! एक कोटी ८० लाखांत मुंबई इंडियन्सला मिळाली दिग्गज कर्णधार

Smriti-Mandhana

स्म्रिती मंधानाची रॉयल एन्ट्री! तब्बल 3 कोटी 40 लाखाची बोली घेत बंगळूरु संघाच्या ताफ्यात दाखल

Ellyse-Perry

तगडी बोली घेत एलिस पेरी आरसीबीकडे! स्मृतीसह लढवणार मैदान

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143