Wednesday, March 29, 2023
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

दिल्ली कसोटीआधी ऑस्ट्रेलिया पुन्हा अडचणीत, VCA कर्मचाऱ्यांनी फेरले पाहुण्या संघांच्या अपेक्षांवर ‘पाणी’

दिल्ली कसोटीआधी ऑस्ट्रेलिया पुन्हा अडचणीत, VCA कर्मचाऱ्यांनी फेरले पाहुण्या संघांच्या अपेक्षांवर 'पाणी'

February 13, 2023
in क्रिकेट, टॉप बातम्या
Photo Courtesy: Twitter/Cricket Australia

Photo Courtesy: Twitter/Cricket Australia


भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा कसोटी सामना दिल्लीमध्ये 17 फेब्रुवारीपासून खेळला जाणार आहे. तत्पूर्वी मालिकेतील पहिला सामना नागपूरच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशन (VCA) स्टेडियमवर खेळला गेला. पहिल्या कसोटीत भारताने एक डाव आणि 132 धावांच्या फरकाने विजय मिळवला, पण नागपूर स्टेडियमची खेळपट्टी वादाचा विषय ठरली. फिरकी गोलंदाजांसाठी अधिक अनुकूल असलेल्या या खेळपट्टीवर पराभवानंतर ऑस्ट्रेलियन संघ सराव करू इच्छित होता, पण ग्राउंट स्टाफने ऑस्ट्रेलियाची चांगलीच निराशा केली.

नागपूर कसोटीत (Nagpur Test) खेळपट्टी फिरकी गोलंदाजांसाठी अनुकूल ठरली. ऑस्ट्रेलियासाठी या सामन्यातून टॉड मर्फी (Todd Murphy) याने कसोटी पदार्पण केले आणि पहिल्याच डावात 7 विकेट्सचा हॉल घेतला. भारतासाठी पहिल्या सामन्यात रविंद्र जडेजा, तर दुसऱ्या सामन्यात रविचंद्रन अश्विन यांनी पाच विकेट्सचा हॉल नावावर केला. सामन्यातील 20 विकेट्सपैकी जडेजा आणि अश्विन जोडीने एकून 15 विकेट्स नावावर केल्या. ऑस्ट्रेलियन फलंदाज मात्र भारतीय फिरकीपटूंमुळे चांगलेच अडचणी आल्याचे दिसले. ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 177, तर दुसरा डाव अवघ्या 91 धावांवर गुंडाळला गेला.

पहिल्या सामन्यातील खराब फलंदाजीनंतर ऑस्ट्रेलियन संघ दुसऱ्या कसोटी सामन्यात असे प्रदर्शन करू इच्छित नाहीये.  नागपूर कसोटी सामना तिसऱ्या दिवशी निकाली निघाल्यानंतर पुढचे दोन दिवस ऑस्ट्रेलियाला याठिकाणच्या खेलपट्टीवर सराव करायचा होता. ऑस्ट्रेलियन संघाने पहिल्या कसोटीतील पराभवानंतर ग्राउंड स्टाफकडे खेळपट्टीवर त्यांचा संघ सराव करू इच्छितो अशी विनंती देखील केली होती. पण तरीही कर्मचाऱ्यांना शनिवारी (11 फेब्रुवारी) सामना संपल्यानंतर रात्री खेळपट्टीवर पाणी टाकले. अशात ऑस्ट्रेलियन संघाला या खेळपट्टीवर सराव करता येणार नाही. या प्रकरणानंतर ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू इयान हिली (Ian healy) चांगलेच संतापले आहेत.

या प्रकरणावर दिग्गज इयान हिली म्हणाले की, “ही चुकीचे आहे. ऑस्ट्रेलियन संघाने विनंती करून देखील खेळपट्टीवर पाणी का टाकले गेले? या प्रकरणात आयसीसीने हस्तक्षेप केला पाहिजे. हे खूपच निराशाजनक आहे आणि क्रिकेटसाठी चांगली गोष्ट नाहीये. ही मागणी फक्त पुढच्या आठवड्याच्या सराव सत्रासाठी केली गेली होती. पण अचानक असे करणे खूप चुकीचे आहे.” तत्पूर्वी लाईव्ह सामन्यात रविंद्र जडेजाने हाताच्या बोटाला मलम लावल्याने देखील वाद सुरू झाला होता. अशात आता खेळपट्टीवर पाणी टाकल्यानंतर हे प्रकरण किती पेट घेणार, हे येत्या लवकरच समजेल.

दरम्यान, पहिल्या कसोटीत पराभव स्वीकारल्यानंतर ऑस्ट्रेलियान संघ या बॉर्डर गावसकर ट्रॉफीत 1-0 अशा अंतराने मागे पडला आहे. उभय संघांतील दुसरा कसोटी सामना 17 फेब्रुवारीपासून दिल्लीमध्ये खेळला जाईल. मालिकेती तिसरा सामना 1 मार्च रोजी सुरू होईल, तर चौथा सामना 9 ते 14 मार्चदरम्यान खेळवला जाईल. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा शेवटच्या टप्प्यात आली असून भारताने ही मालिका जिंकल्यानंतर संघ असोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पोहोचू शकतो. अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना 7 ते 11 जून दरम्यान द ओव्हल मैदानावर खेळला जाईल. (Even when Australia was supposed to practice in Nagpur, the ground staff poured water on the pitch)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-

बॉर्डर गावसकर ट्रॉफीविषयी मोठी अपडेट, धरमशालातील तिसरा कसोटी सामन रद्द!
BREAKING: गल्फ जायंट्स ठरला इंटरनॅशनल लीग टी20 चा पहिला बादहाश


Next Post
jemimah rodrigues

जेमिमाह रॉड्रिग्जने उचलला पंचांच्या चुकीचा पुरेपूर फायदा, पाकिस्तानने गमावला विश्वचषकातील पहिला सामना

Virat Kohli Eoin Morgan

मोठी बातमी! वर्ल्डकप विजेत्या कर्णधाराची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून तडकाफडकी निवृत्ती

Photo Courtesy: Twitter/ICC

व्वा! एक कोटी ८० लाखांत मुंबई इंडियन्सला मिळाली दिग्गज कर्णधार

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143