---Advertisement---

ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर कोणालाही न जमलेली कामगिरी ‘सांगलीकर’ स्मृतीने दाखवली करून

On: रविवार, ऑक्टोबर 3, 2021 10:35 PM
---Advertisement---

ऑस्ट्रेलिया महिला विरुद्ध भारत महिला यांच्यातील एकमेव कसोटी सामना मॅट्रिकॉन स्टेडियम येथे खेळला गेला. चार दिवसाच्या खेळानंतर हा सामना अनिर्णित राहिला. तब्बल १५ वर्षांच्या कालावधीनंतर उभय संघांमध्ये हा कसोटी सामना खेळला गेला. भारताची सलामीवीर स्मृती मंधाना ही या सामन्याची मानकरी ठरली. यासोबतच तिने ऑस्ट्रेलियाच्या धर्तीवर एक नवा कारनामा केला.

स्मृतीसाठी संस्मरणीय ठरला सामना
आपल्या कारकीर्दीतील केवळ चौथा कसोटी सामना खेळत असलेली डावखुरी स्मृती मंधाना हिच्यासाठी हा सामना संस्मरणीय ठरला. तिने सामन्याच्या पहिल्या डावात १२७ धावांची शानदार शतकी खेळी करत, कसोटी कारकिर्दीतील पहिले शतक साजरे केले. तसेच, दुसऱ्या डावातही तिने ३१ धावा केल्या. या शतकी खेळीनंतर ती ऑस्ट्रेलियाच्या धर्तीवर वनडे व कसोटी क्रिकेटमध्ये शतक झळकावणारी पहिली भारतीय क्रिकेटपटू (पुरुष व महिला) बनली‌.

सामनावीर पुरस्कार पटकावत केली अनोखी कामगिरी
या सामन्यात सामनावीर पुरस्कार पटकावून स्मृतीने महिला क्रिकेटमधील एक विशेष कामगिरी नोंदवली. ऑस्ट्रेलियाचा धर्तीवर कसोटी, वनडे व टी२० क्रिकेटमध्ये सामनावीर पुरस्कार पटकावणारी ती केवळ दुसरी महिला क्रिकेटपटू ठरली‌. विशेष म्हणजे ऑस्ट्रेलिया व्यतिरिक्त इतर देशांची अशी कामगिरी करणारी ती एकमेव क्रिकेटपटू आहे. ऑस्ट्रेलियाच्या धर्तीवर क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांत सामनावीर पुरस्कार पटकावणारी ती पहिली महिला क्रिकेटपटू ऑस्ट्रेलियाची अष्टपैलू एलिसा पेरी ही आहे.

एकमेव कसोटी राहिली अनिर्णीत
या सामन्यात भारतीय संघाने स्मृती मंधानाच्या शतकाच्या जोरावर पहिल्या डावामध्ये ३७७ धावा काढून डाव घोषित केला. प्रत्युत्तरात, ऑस्ट्रेलियासाठी एलिसा पेरी व ऍश्ले गार्डनर यांनी अर्धशतके ठोकत २९१ धावा केल्या. भारताने आपला दुसरा डाव १३५ धावांवर घोषित करून ऑस्ट्रेलियासमोर २२२ धावांचे आव्हान ठेवले होते. मात्र, चौथ्या दिवसाखेर ऑस्ट्रेलियाने २ बाद ३६ धावा करून सामना अनिर्णित राखला.

महत्त्वाच्या बातम्या – 

‘खास खेळाडू महान गोष्टींसाठी बनलेले असतात’, ऋतुराज गायकवाडवर होतोय कौतुकाचा वर्षाव

कमनशिबी जोडी नं.१! तब्बल ‘इतक्या’ वेळा संघाला विजयापर्यंत नेऊ शकले नाहीत राहुल-मयंक

काय सांगता? आरसीबीसाठी युझवेंद्र चहलला करायची आहे तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी, पाहा व्हिडिओ

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---