मुंबई येथे खेळल्या जात असलेल्या पहिल्या वुमेन्स प्रीमियर लीग स्पर्धेची साखळी फेरी समाप्त झाली आहे. मुंबई इंडियन्स, दिल्ली कॅपिटल्स व युपी वॉरियर्झ हे संघ प्ले ऑफसाठी पात्र झाले. त्याचवेळी सर्वाधिक अपेक्षा असलेल्या रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाला मात्र पहिल्या हंगामात अपयश आले. त्यांना आपल्या अखेरच्या सामन्यातही मुंबई इंडियन्सने पराभूत केले. मात्र, आरसीबीची कर्णधार स्मृती मंधाना ही प्रथमच गोलंदाजी करताना दिसली.
https://twitter.com/Vikasdadhich01/status/1638208033343045635?t=v1gUqmlJf2B4sudcYRc8jg&s=19
यापूर्वी स्पर्धेतून बाद झालेल्या आरसीबीसाठी हा सामना आपल्या युवा खेळाडूंना परखण्यासाठी उत्तम व्यासपीठ होते. या सामन्यात हरमनप्रीत कौर (Harmanpreet Kaur) हिने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. हा निर्णय मुंबईच्या खेळाडूंनी सार्थ ठरवला. यावेळी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Royal Challengers Bangalore) संघाने फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकात 9 विकेट्स गमावत 125 धावा केल्या होत्या. हे आव्हान पार करताना मुंबईच्या खेळाडूंनी 16.3 षटकात 129 धावा केल्या आणि 4 विकेट्सने सामना खिशात घातला.
या सामन्यात अखेरीस मुंबईला विजयासाठी चार षटकात केवळ पाच धावांची आवश्यकता असताना स्वतः कर्णधार स्मृतीने चेंडू हातात घेतला. यावेळी तिची गोलंदाजी पाहून अनेकांना विराट कोहलीची आठवण झाली. डाव्या हाताने फलंदाजी करत असली तरी, तिने गोलंदाजी मात्र उजव्या हाताने केली. तिच्या चार चेंडूची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा झाली. काहींनी तू अष्टपैलू होऊ शकते असे देखील म्हटले.
Smriti Mandhana bowling!!🙆🏻♂️#TATAWPL #ನಮ್ಮRCB #RCBvsMI #SmritiMandhana pic.twitter.com/zlgKIYxend
— Prajwal Kalappa (@PrajwalKalappa) March 21, 2023
स्मृतीच्या WPL च्या पहिल्या हंगामातील कामगिरीबाबत बोलायचं झालं, तर तिने या स्पर्धेत 8 सामने खेळताना 18.62च्या सरासरीने आणि 111.9च्या स्ट्राईक रेटने 149 धावा केल्या आहेत. तिला यादरम्यान एकही अर्धशतक ठोकता आले नाही. तिची या हंगामातील सर्वोत्तम धावसंख्या ही 37 इतकी आहे. यासोबतच संघ सहा सामन्यात पराभूत देखील झाला. विशेष म्हणजे स्मृती 3 कोटी 40 लाख रुपयांच्या बोलीसह स्पर्धेतील सर्वात महागडी खेळाडू होती.
(Smriti Mandhana Bowling First Time In WPL For RCB Action Look Like Virat Kohli)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
वनडे विश्वचषक 2023चं वेळापत्रक आलं रे, ‘या’ दिवशी खेळला जाणार अंतिम सामना?
वनडेत अपयशी ठरत असलेल्या सूर्याच्या खांद्यावर ठेवला कोच द्रविडने हात! म्हणाला, “त्याच्यात गुणवत्ता असून…”