भारत आणि ऑस्ट्रेलिया महिला संघांमध्ये सध्या दिवस-रात्र कसोटी खेळली जात आहे. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारतीय संघाने ५ बाद २७६ धावा केल्या आहे आणि सलामीवीर फलंदाज स्म्रीती मंधनाने सर्वाधिक १२७ केल्या आहेत. मंधनाने तिच्या कसोटी कारकिर्दीत केलेली हा सर्वोच्च धावसंख्या ठरली आहे. अशातच स्म्रीती मागच्या तीन महिन्यांपासून गुलाबी चेंडू तिच्या किटमध्ये घेऊन फिरत असल्याचे समोर आले आहे. तिने स्वत: या गोष्टीची माहिती दिली आहे.
स्म्रीतीने पहिल्या दिवसाचा खेळ समाप्त झाल्यानंतर सांगिलते की, “आम्ही केवळ दोन सत्रामध्ये गुलाबी चेंडूने सराव केला आहे. मी हंड्रेडमध्ये खेळून आले होते आणि मला गुलाबी चेंडूने खेळण्याची जास्त संधी मिळाली नव्हती, पण हंड्रेडदरम्यान मी गुलाबी कूकाबूरा चेंडू मागवला. मी त्याला माझ्या खोलीत ठेवले कारण मला माहित हेते की, आम्ही दिवस-रात्र कसोटी सामना खेळणार आणि त्यामुळे मी चेंडूला पाहून त्याला समजून घेऊ इच्छित होत.”
स्म्रीतीने पुढे सांगितले की, “मी प्रत्यक्ष्यात याने फलंदाजी केली नाही. मी केवळ दोन सत्रात याने फलंदाजी केली, पण मागच्या अडीच-तीन महिन्यांपासून गुलाबी चेंडू माझ्या किटमध्ये आहे. मला माहित नाही की, मी त्याला कशासाठी ठेवले होते. मला सरावासाठी वेळ मिळण्याची अपेक्षा होती, पण असे होऊ शकले नाही.”
गुलाबी चेंडूने खेळल्या जाणाऱ्या दिवस-रात्र कसोटी सामन्याविषयी स्म्रीती म्हणाली, “मला नाही वाटत की, आम्हाला याबाबत काम करण्यासाठी अधिक वेळ मिळाला. आम्ही केवळ प्रयत्न करत आहोत. बाहेर बसलेल्या लोकांनी दिवसभर माझा उत्साह कायम ठेवला. त्यामुळे मदत मिळाली.”
“मला धावफलक पाहायचा नव्हता आणि मी मोकळ्या मनाने खेळण्याच्या प्रयत्नात केला. चेंडूचे आकलन करून त्याला त्याचप्रकारे खेळले. मी प्रत्यक्षात कोणतीही रणनीती बनवली नव्हती. आता मी शतकाविषयी विचार करत नाही. संघासाठी आता गरजेचे आहे की, मी खेळपट्टीवर टिकून राहावे. माझे लक्ष्य केवळ चेंडूवर, त्याला चांगल्या प्रकारे खेळण्यावर आहे,” असेही स्म्रीती म्हणाली आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
‘अजून १०-१५ धावा असत्या तर चेन्नईला हरवू शकलो असतो’, पराभवानंतर विलियम्सनची प्रतिक्रिया
“धोनीने ज्याप्रकारे विजयी षटकार मारला, त्यामुळे विरोधी संघांनी आता घाबरले पाहिजे”