---Advertisement---

आयसीसीच्या वनडे, टी20 संघात या भारतीय क्रिकेटपटूंना मिळाले स्थान

On: मंगळवार, डिसेंबर 17, 2019 8:40 PM
---Advertisement---

भारतीय सलामीवीर स्मृती मंधनाचा मंगळवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) यावर्षीच्या सर्वोत्तम वनडे आणि टी20 संघात समावेश केला आहे. वनडे संघात झूलन गोस्वामी, पूनम यादव आणि शिखा पांडे आणि टी20 संघात अष्टपैलू दीप्ती शर्मा यांच्यासह मंधानालाही स्थान मिळाले आहे.

23 वर्षीय मंधानाने 51 वनडे सामने आणि 66 टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यांव्यतिरिक्त दोन कसोटी सामन्यांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. वनडे आणि टी20 सामन्यात तिने 3476 धावा केल्या आहेत .

याबरोबरच आज आयसीसीने 2019चे महिलांचे वार्षिक पुरस्कारही घोषित केले आहेत. ऑस्ट्रेलियन (Australian) महिला अष्टपैलू क्रिकेटपटू एलिसा पेरीने (Ellyse Perry) आयसीसीचा या वर्षातील सर्वोत्तम महिला क्रिकेटपटूचा ‘रॅचेल हेहो-फ्लिंट’ (Rachael Heyhoe- Flint Award) पुरस्कार जिंकला केले.

त्याचबरोबर, तिला या वर्षातील आयसीसी सर्वोत्तम महिला वनडे खेळाडू (ICC ODI Player of The Year) म्हणूनही गौरविण्यात आले आहे.

पेरी व्यतिरिक्त ऑस्ट्रेलियाचीच महिला क्रिकेटपटू एलिसा हेलीला या वर्षातील आयसीसीचा सर्वोत्तम महिला टी20 क्रिकेटपटूचा पुरस्कार देण्यात आला आहे. तर या वर्षातील सर्वोत्तम उदयोन्मुख महिला क्रिकेटपटूचा पुरस्कार थांयलंडची क्रिकेटपटू चनिदा सुथीरूआंगला देण्यात आला आहे.

2019चा आयसीसी महिला वनडे संघ – 1. एलिसा हेली – ऑस्ट्रेलिया, 2. स्मृती मंधाना – भारत, 3. टी. ब्यूमॉन्ट – इंग्लंड, 4. मेग लॅनिंग – ऑस्ट्रेलिया(कर्णधार), 5. स्टेफनी टेलर – वेस्ट इंडिज, 6. एलिसे पेरी – ऑस्ट्रेलिया, 7. जेस जोनाथन- ऑस्ट्रेलिया, 8. शिखा पांडे – भारत, 9. झुलन गोस्वामी – भारत, 10. मेगन शट – ऑस्ट्रेलिया, 11. पूनम यादव – भारत.

2019 आयसीसी महिला टी20 संघ – 1. एलिसा हेली – ऑस्ट्रेलिया, 2. डॅनियल वॅट – इंग्लंड, 3. मेग लॅनिंग – ऑस्ट्रेलिया(कर्णधार), 4. स्मृती मंधाना – भारत, 5. लीजेल ली – दक्षिण आफ्रिका, 6. एलिसे पेरी – ऑस्ट्रेलिया, 7. दीप्ती शर्मा – भारत, 8. निदा दार-पाकिस्तान, 9. मेगन शट – ऑस्ट्रेलिया, 10. शबनम इस्माईल – दक्षिण आफ्रिका, 11. राधा यादव – भारत.

आयसीसी महिला पुरस्कार 2019 – 

राचेल हेहो फ्लिंट पुरस्कार – 2019 वर्षातील सर्वोत्तम महिला क्रिकेटपटू – एलिसा पेरी (ऑस्ट्रेलिया)

2019 वर्षातील आयसीसी सर्वोत्तम महिला वनडे क्रिकेटपटू – एलिसे पेरी (ऑस्ट्रेलिया)

2019 वर्षातील आयसीसी सर्वोत्तम महिला टी20 क्रिकेटपटू – एलिसा हेली (ऑस्ट्रेलिया)

2019 वर्षातील सर्वोत्तम उदयोन्मुख महिला क्रिकेटपटू – चनिदा सुथीरूआंग (थायलंड)

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---