आयसीसीने मंगळवारी (24 जानेवारी) मागच्या वर्षी वनडे क्रिकेटमध्ये सर्वोत्तम प्रदर्शन करणाऱ्या महिला खेळाडूंना सन्मानित केले गेले. मंगळवारी घोषित केल्या गेलेल्या आयसीसी वनडे टीम ऑफ द ईयर (महिला) मध्ये भारताच्या स्म्रीती मंधाना, हरमनप्रीत कौर आणि रेणुका सिंग यांना संधी मिळाला. तसेच हरमनप्रीतचे अप्रतिम प्रदर्शन पाहता आयसीसीने या संघाचे कर्णधारपद तिच्याकडेच सोपवले आहे.
2022 आयसीसी वनडे टीम ऑप द ईयर (महिला) –
अलिसा हेली (WK), स्म्रीती मंधाना, लॉरा वोल्वार्ड, नॅट सिव्हर, बेथ मूनी, हरमनप्रीत कौर (कर्णधार), अमेलिया केर, सोफी एक्लेस्टोन, आयाबोंगा खाका, रेणुका सिंह, शबनिम इस्माईल
🇮🇳 x 3
🇿🇦 x 3
🇦🇺 x 2
🏴 x 2
🇳🇿 x 1The ICC Women's ODI Team of the Year 2022 is here! #ICCAwards | More 👇
— ICC (@ICC) January 24, 2023
हरमनप्रीत कौर (Harmanpreet Kaur) आणि स्म्रीती मंधाना (Smriti Mandhana) आणि रेणुका सिंग (Smriti Mandhana) यांचे मागच्या वर्षीचे वनडे प्रदर्शन पाहता ते जबरदस्त राहिले आहे. संघासाठी मागच्या वर्षी हरनप्रीत कौर आणि स्म्रीती मंधाना यांनी सर्वाधिक धावा केल्या. हरमनप्रीत कौरने मागच्या वर्षी खेळलेल्या 17 वनडे सामन्यांपैकी 16 सामन्यांमध्ये तिने फलंदाजी केली. यात हरमनप्रीतने 58.00 च्या सरासरी आणि 89.76 च्या स्ट्राईक रेटने 754 धावा केल्या. यादरम्यान नाबाद 143* ही तिची सर्वात मोठी खेळी होती. स्म्रीती मंधाना मागच्या वर्षी संघासाठी सर्वाधिक वनडे धावा करणारी दुसरी फलंदाजी होती. स्म्रीतीने 2022 मध्ये 15 वनडे सामन्यांत 49.71 ची सरासरी आणि 81.21 च्या स्ट्राईक रेटने 696 धावा केल्या. यादरम्यान तिची सर्वात मोठी खेली 123 धावांची होती.
रेणुका सिंगच्या प्रदर्शनाचा विचार केला, मागच्या वर्षी एकूण 7 वनडे सामन्यांमध्ये तिला खेळण्याची संधी मिळाली. यादरम्यान वेगवान गोलंदाज रेणुकाने नेत्रदीपक कामगिरी करून दाखवली. तिने 4.62 च्या इकॉनॉमीने धावा खर्च करत या सात सामन्यांमध्ये 18 विकेट्स घेतल्या आणि एकूण 268 धावा खर्च केल्या. (Smriti Mandhana, Harmanpreet Kaur and Renuka Singh named in ICC ODI Team of the Year 2022)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
तिसऱ्या वनडेसाठी मैदानात उतरताच रोहित-विराटचा खास विक्रम, अझरुद्दीन अन् गांगुलीलाही पछाडले
तिसऱ्या वनडेत नाणेफेकीचा निकाल न्यूझीलंडच्या बाजूने, भारतीय संघात दोन महत्त्वाचे बदल