---Advertisement---

ही नव्या युगाची नांदी! महिला आयपीएलला करोडो मिळाल्याने पोरी झाल्या खूश; म्हणाल्या…

---Advertisement---

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआयने महिला इंडियन प्रीमियर लीगसाठी मीडिया राईट्सचा करार केला आहे. वायकॉम 18 या कंपनीने महिला आयपीएलचे पुढच्या पाच वर्षासाठीचे मीडिया राईट्स  तब्बल 951 कोटींना खरेदी केले. त्यानंतर आता भारतीय महिला क्रिकेटपटूंनी या निर्णयानंतर आनंद व्यक्त केला आहे.

महिला आयीपएलच्या मीडिया राईट्ससाठी 16 जानेवारी (सोमवार) अर्ज मागवले गेले होतो. वायकॉम 18 सोबतच झी, सोनी आणि डिज्नी अशा काही मोट्या कंपन्या हे राईट्स खरेदी करण्यासाठी स्पर्धेत होत्या. मात्र, वायकॉम 18 ने इतर कंपन्यांना मागे टाकत बीसीसीआयसोबत करार केला. माहिती सर्वांना दिली.

https://twitter.com/ImHarmanpreet/status/1614940816765767681?t=FKMH7IWJvjC8W7G58NRJZQ&s=19

 

त्यानंतर भारतीय संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर हिने ट्विट करत लिहिले,

‘भारतीय क्रिकेटमधील या ऐतिहासिक दिवसासाठी बीसीसीआय व वायकॉम 18 यांचे अभिनंदन. आजपासून एक नवे पर्व सुरू होत आहे. एक असे व्यासपीठ तयार झाले आहे ज्यामुळे आमच्या महिला खेळाडूंना अधिक संधी मिळेल. त्यांना आंतरराष्ट्रीय पातळीवर स्वतःला सिद्ध करता येईल. आमच्या प्रतिभेने तुम्ही मंत्रमुग्ध व्हाल.’

https://twitter.com/mandhana_smriti/status/1614947273099866112?t=GcLdwOshnHCIdlMaotcPNg&s=19

 

भारतीय संघाची उपकर्णधार स्मृती मंधानाने ट्विट करत लिहिले,

‘हा तो दिवस आहे जो प्रत्येक भारतीय महिला क्रिकेटपटूचा लक्षात राहील. महिला आयपीएल आकार घेत आहे. यासाठी प्रयत्न करणाऱ्या सर्वांचे आभार. अशी संधी मिळाल्यानंतर प्रत्येक खेळाडू आपली प्रतिभा दाखवण्यासाठी तयार असेल. मुलींना तयार व्हा’

याव्यतिरिक्त भारताच्या माजी महिला क्रिकेटपटू मिताली राज व झुलन गोस्वामी यांनी देखील आपली प्रतिक्रिया दिली.

महिला आयपीएल फ्रँचायझींची मालकी मिळवण्यासाठी 25 जानेवारीपासून अर्ज मागवले जाणार आहेत. लवकरच या स्पर्धेसाठी खेळाडूंचा लिलाव आयोजित केला जाणार आहे. लिलावाची तारीख अद्याप समोर आली नाहीये.

(Smriti Mandhana Harmanpreet Kaur Happy After Women’s IPL Media Rights Bid)

महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-

नाद नाद नादच! भारताचा 19 वर्षांखालील महिला विश्वचषकात विश्वविक्रम, वाचून तुम्हालाही वाटेल अभिमान
‘रोहितलाही विराटसारखी वागणूक द्या…’, गौतम गंभारची मोठी प्रतिक्रिया 

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---