आयसीसी महिला टी20 विश्वचषकाची (ICC Women’s T20 World Cup) सुरूवात गुरूवारी (3 ऑक्टोबर) पासून होणार आहे. त्यामध्ये भारतीय संघाचा पहिला सामना (4 ऑक्टोबर) रोजी न्यूझीलंडविरूद्ध होणार आहे. ही स्पर्धा सुरू होण्यापूर्वी भारताची स्टार महिला खेळाडू स्म्रीती मानधनाने (Smriti Mandhana) मोठे वक्तव्य केले आहे. मानधनाच्या म्हणण्यानुसार, जेव्हा एखादा खेळाडू आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळतो त्यावेळी त्याच्याकडे कोणतेही निमित्त नसते.
स्म्रीती मानधनाने (Smriti Mandhana) स्टार स्पोर्ट्सशी बोलताना सांगितले की, “दुपारचा सामना उष्णतेमुळे आव्हानात्मक असणार आहे, परंतु जेव्हा तुम्ही भारतासाठी खेळता तेव्हा काही निमित्त चालत नाही, तुम्हाला चांगली तयारी करावीच लागेल आणि मला वाटते की आमच्याकडे तयारीसाठी थोडा कमी वेळ आहे.”
पुढे बोलताना मानधना म्हणाली, “मला खात्री आहे की, जेव्हा आपण पाकिस्तानचा सामना करू तेव्हा आपण तयार होऊ. मानसिकदृष्ट्या, आम्हाला मजबूत राहण्याची गरज आहे, भारतातून आलो आहोत, इतर संघांच्या तुलनेत आम्हाला उष्णतेची थोडीशी सवय झाली आहे. परंतु सुरुवातीचे काही दिवस खरोखरच थकवणारे होते. पण तयारी खरोखरच चांगली झाली आहे आणि येथे येण्यापूर्वी आम्ही बंगळुरूमध्ये एक उत्तम शिबिर घेतले जिथे आम्ही सर्व व्यवस्थित करण्याचा प्रयत्न केला.”
महिला क्रिकेटमधील भारत-पाकिस्तान संघाविषयी बोलताना मानधना म्हणाली, “मला वाटते की भारत-पाकिस्तान संघातील संघर्ष हा इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा चाहत्यांच्या भावनांचा असतो, असे नाही की खेळाडू एकमेकांशी बोलत नाहीत. ही भावना दोन्ही देशांसाठी इतकीच तीव्र करणारी आहे.
टी20 विश्वचषकातील भारतीय संघाचे वेळापत्रक
4 ऑक्टोबर, भारत विरुद्ध न्यूझीलंड, दुबई
6 ऑक्टोबर, भारत विरुद्ध पाकिस्तान, दुबई
9 ऑक्टोबर, भारत विरुद्ध श्रीलंका, दुबई
13 ऑक्टोबर, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया, शारजाह
महत्तवाच्या बातम्या-
पाकिस्तानचा ‘हा’ खेळाडू मैदानावर खरंच करतो दुखापतीचं नाटक?
बुमराह नंबर 1 टेस्ट बॉलर, तर अश्विनची घसरण; विराटनंही घेतली मोठी झेप!
बाबर आझमनंतर पाकिस्तानचा पुढील कर्णधार कोण होणार? हा खेळाडू शर्यतीत सर्वात पुढे