सध्या आयसीसी महिला टी20 विश्वचषक (ICC Women’s T20 World Cup) खेळला जात आहे. त्यामधील 7वा सामना भारत-पाकिस्तान (India vs Pakistan) संघात खेळला गेला. या सामन्यात भारताने 6 गडी राखून विजय मिळवला. पण सामन्यादरम्यान भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौरच्या (Harmanpreet Kaur) मानेला चेंडू लागला, ज्यामुळे तिला 29 धावांवर मेदान सोडावे लागले. हरमनप्रीतच्या दुखापतीबद्दल स्टार सलामीवीर स्म्रीती मानधनाने (Smriti Mandhana) वक्तव्य केले आहे.
स्म्रीती मानधना (Smriti Mandhana) म्हणाली, “हरमनप्रीतच्या दुखापतीबद्दल काहीही सांगणे घाईचे आहे, डॉक्टर त्याची चौकशी करत आहेत. आशा आहे की ती लवकर बरी होईल.”
तत्पूर्वी रविवारी (10 ऑक्टोबर) रोजी महिला टी20 विश्वचषकातील अ-गटातील झालेल्या सामन्यात भारताने चुरशीने गोलंदाजी करत पाकिस्तानला 8 विकेट्सवर 105 धावांवर रोखले. भारताने लक्ष्याचा पाठलाग 18.5 षटकात 4 गड्यांच्या मोबदल्यात केला. या सामन्याचा सामनावीर पुरस्कार अरुंधती रेड्डीला देण्यात आला. यंदाच्या विश्वचषक स्पर्धेतील भारताचा हा पहिलाच विजय ठरला आहे. या विजयासह भारत-अ गटात चौथ्या स्थानावर आला आहे.
या सामन्यात पाकिस्तानने टाॅस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने 105 धावा केल्या. प्रत्युत्तरात भारताने 18.5 षटकात लक्ष्य गाठले. भारतासाठी स्टार सलामीवीर शफाली वर्माने (Shafali Verma) 35 चेंडूत 32 धावा केल्या. दरम्यान तिने 3 चौकार लगावले. स्म्रीती मानधना (Smriti mandhana) 7, जेमिमाह राॅड्रिग्ज 23, कर्णधार हरमनप्रीत कौर (Harmanpreet Kaur) 29 धावांच्या खेळीवर भारताने विजय मिळवला. भारतीय संघ आता पुढचा सामना 9 ऑक्टोबरला श्रीलंकेविरुद्ध खेळणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
IND vs BAN; भारताचा बांगलादेशवर 7 गडी राखून दमदार विजय!
“धर्मानंतर क्रिकेट पुढे…” प्लेइंग इलेव्हनबद्दल बोलताना काय म्हणाला पाकिस्तानी कर्णधार
IND vs BAN; पदार्पण सामन्यातच ‘या’ स्टार खेळाडूने रचला इतिहास!