भारतीय महिला संघाची स्टार स्मृती मंधानाने न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या निर्णायत वनडे सामन्यात ऐतिहासिक कामगिरी केली आहे. न्यूझीलंडविरुद्धची एकदिवसीय मालिका संपल्यानंतर मंधानाने आणखी एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. जे की ही कामगिरी करायला दिग्गज मिताली राजला 23 वर्षे लागली पण मंधानाने अवघ्या 11 वर्षात ही चमकदार कामगिरी केली. मंधाना आता भारतासाठी शतकांची क्विन बनली आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके ठोकण्याचा विक्रम आता तिच्या नावावर आहे.
टी20 चॅम्पियन न्यूझीलंड संघाविरुद्ध भारताची तीन सामन्यांची वनडे मालिका नुकतीच पार पडली. सुरुवातीच्या दोन सामन्यात मालिका 1-1 ने बरोबरीत होती. पहिल्या सामन्यात भारताला, तर दुसऱ्या सामन्यात किवी संघाला विजय मिळाला होता. अश्या स्थितीत तिसरा सामना दोन्ही संघासाठी म्हत्वाचा होता. हा निर्णायक सामना नरेंद्र मोदी स्टेडियम अहमदाबाद येथे खेळला गेला. करा किंवा मराच्या सामन्यात मंधानाने शानदार शतक झळकावले. ज्यामध्ये तिने 122 चेंडूत 10 चौकारांच्या मदतीने 100 धावांची उत्कृष्ट खेळी केली. या कामगिरीच्या जोरावर आता मंधानाच्या नावावर भारतासाठी सर्वाधिक 8 शतके झाले आहेत.
Most Hundreds for India in Women’s Cricket in ODIs:
Smriti Mandhana – 8* (88 innings).
Mithali Raj – 7 (211 innings). pic.twitter.com/Mb4epODc6N
— Johns. (@CricCrazyJohns) October 29, 2024
स्मृती मंधनाने मिताली राजचा विक्रम मागे टाकली आहे. मितालीने आपल्या कारकिर्दीत 232 एकदिवसीय सामन्यांमध्ये 8 वेळा शतकी खेळी खेळली होती. मात्र मंधानाने अवघ्या 88 सामन्यांमध्ये ही कामगिरी केली आहे. आता भारतीय संघ डिसेंबरमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकदिवसीय मालिका खेळणार आहे. या मालिकेत टीम इंडिया कशी कामगिरी करते हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
टीम इंडियाने एकदिवसीय मालिकेत न्यूझीलंडचा 2-1 ने पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने स्कोअरबोर्डवर 232 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल मंधानाचे शतक आणि कर्णधार हरमनप्रीत कौरचे अर्धशतक यांनी सामना टीम इंडियाच्या झोतात टाकला. स्मृती मानधना सामन्याची हिरो ठरली.
हेही वाचा-
चाहत्यांसाठी खुशखबर..! विराट कोहली पुन्हा एकदा कर्णधाराच्या भूमिकेत!
“भारताला हरवणे शक्य…”, मुंबई कसोटीपूर्वी न्यूझीलंडच्या वेगवान गोलंदाजाची प्रतिकिया
टी20 मध्ये सर्वाधिक अर्धशतके झळकाणारे फलंदाज (टाॅप-5)