भारतीय महिला आणि पुरुष क्रिकेट संघ, गुरुवारी (३ जून) इंग्लंडच्या दिशेने रवाना झाले आहेत. भारतीय पुरुष संघाला येत्या १८ जून ते २२ जून दरम्यान विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना खेळायचा आहे. तर येत्या १६ जून पासून भारतीय महिला संघ, इंग्लंड महिला संघाविरुद्ध एकमात्र कसोटी सामना खेळणार आहे. सध्या दोन्ही संघ साउथॅम्प्टनच्या हॉटेलमध्ये विलगिकरणाचा कालावधी पूर्ण करत आहेत. अशातच भारतीय महिला संघातील फलंदाज स्मृती मंधानाने आपली एक खास सवय सांगितली आहे.
भारतीय महिला संघ तब्बल ७ वर्षांनंतर पहिल्यांदाच कसोटी सामना खेळणार आहे. त्यामुळे भारतीय संघातील खेळाडू खूप उत्साही आहेत. अशातच स्मृती मंधानाने म्हटले आहे की, “मी प्रत्येक जागी खूप झोप काढते. पण ब्रिटन चांगले आहे. हे वातावरण मला सुट करते. इथे मी खूप लवकर झोपून जाते. तसेच लवकर उठून देखील जाते. हा एकमात्र देश आहे जिथे मी साडेपाच ते सहाच्या दरम्यान उठून जाते.”
या दौऱ्यावर भारतीय पुरुष आणि महिला संघाला एकत्र प्रवास करता आला. त्यामुळे आपल्या अनुभवांची देवाणघेवाण करणे, दोन्ही संघातील खेळाडूंना शक्य झाले. याबाबत बोलतांना स्मृती म्हणाली, “हे खूप प्रोत्साहन देणारे आहे. कारण बऱ्याच दिवसानंतर आम्ही एकत्र प्रवास करत आहोत. टी-२० लीग सुरू असताना आम्ही स्वतंत्रपणे प्रवास केला होता. पण यावेळी आम्ही एकत्र जात असल्याबद्दल उत्सुक आहे.”
भारतीय महिला संघाला या दौऱ्यावर एकमात्र कसोटी सामना तसेच ३ टी२० आणि ३ वनडे सामन्यांची मालिका खेळायची आहे. स्मृती मंधानाने यापूर्वी देखील २ कसोटी सामने खेळले आहेत. या सामन्यांमध्ये तिने २७.००च्या सरासरीने ८१ धावा केल्या आहेत. तसेच वनडे सामन्यातील कामगिरीबद्दल बोलायचं झालं तर तिने आतापर्यंत एकूण ५६ सामने खेळले आहेत. यामध्ये तिने ४२.६ च्या सरासरीने २१७२ धावा केल्या आहेत. तर टी२० क्रिकेटमध्ये तिने ७८ सामन्यांमध्ये १७८२ धावा केल्या आहेत. त्यामुळे आगामी इंग्लंड दौऱ्यावर स्मृती मंधानाकडून चांगल्या कामगिरीची भारतीय संघाला अपेक्षा असणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
भारतीय संघासाठी आनंदाची बातमी! लॉर्डस कसोटीत दिसून आली न्यूझीलंडची ही कमजोरी
आयपीएल नाहीतर ही लीग सर्वोत्तम, आंद्रे रसेलचे धक्कादायक विधान
परदेशी खेळाडूंना मोठा झटका! उर्वरित आयपीएलला नकार दिल्यास बीसीसीआय करणार ही कारवाई