सध्या चिनमध्ये आशियाई गेम्स सुरू आहेत. महिला क्रिकेट स्पर्धेत सोमवारी (25 सप्टेंबर) भारत आणि श्रीलंका यांच्यात अंतिम सामना खेळला गेला. भारताने 19 धावांनी श्रीलंकेला मात देऊन सुवर्णपदक जिंकले. विजयानंतर भारताच्या प्रत्येक खेळाडूला सुवर्णपदक दिले गेले. याच पार्श्वभूमीवर भारताची अनुभवी फलंदाज स्मृती मंधाना हिने नीरज चोप्रा याची आठवण काढली.
नीरज चोप्रा (Neeraj Chopra) भारताचा ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता खेळाडू राहिले आहे. आगामी ऑलिम्पिकमध्येही नीरज पुन्हा एकदा सुवर्णपदकाची कमाई करेल, अशा अपेक्षा व्यक्त केल्या जात आहेत. सोमवारी (25 सप्टेंबर) भारतीय महिला संघाने श्रीलंकेविरुद्ध विजय मिळवून आशियाई गेम्समध्ये सुवर्णपदक मिळवले. पण विजयानंतर स्मृती मंधाना (Smriti Mandhana) हिने नीरजच्या नावाचा उल्लेख केला. अंतिम सामन्यात स्मृतीने भारतासाठी सर्वाधिक 46 धावांची खेळी केली.
विजयानंतर सलामीवीर फलंदाज म्हणाली, “राष्ट्रगीत सुरू असताना जेव्हा वरच्या दिशेने जात होता, तेव्हा माझ्या डोळ्यांमध्ये पाणी आले. हा खूपच खास क्षण होता. आपण याआधी टीव्हीवर पाहिले आहे की, नीरज चोप्रानेही देशासाठी सुवर्णपदक जिंकले होते. मी या क्षणी खूप खुश आहे आणि स्वतःचा अभिमान वाटत असल्यामुळे हसत आहे.”
https://www.instagram.com/p/CxnO4cISiqs/?utm_source=ig_web_copy_link
दरम्यान, भारत आणि श्रीलंका महिला संघात झालेल्या या सामन्याचा विचार केला, तर भारताने प्रथम फलंदाजी करताना 7 बाद 116 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात श्रीलंकन संघाने 20 षटकांमध्ये 8 विकेस्टच्या नुकसानावर 97 धावांपर्यंत मजल मारली. परिणामी भारताला 19 धावांनी विजय मिळाला. भारताची युवा गोलंदाज टिटस साधू हिने 4 षटकात 6 धावा खर्च करून तीन महत्वाच्या विकेट्स घेतल्या, ज्या विजयासाठी महत्वाच्या ठरल्या. (Smriti Mandhana remembers Neeraj Chopra after winning gold in the Asian Games)
महत्वाच्या बातम्या –
वर्ल्डकपसाठी दिग्गजाला कोच म्हणून आणणार इंग्लंड? स्वतः बेन स्टोक्सने दिले संकेत
World Cup 2023 । पीसीबीचा संयम सुटला! भारताचा व्हिजा मिळत नसल्याने घेतली आयसीसीकडे धाव