भारतात सध्या वाढत्या कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे अनेक क्षेत्रांप्रमाणेच क्रीडा क्षेत्रही ठप्प पडले आहे किंवा दुसऱ्या देशातही जरी क्रीडा स्पर्धा सुरु असल्या तरी खेळाडूंना बायोबबलमधून बाहेर येण्याची परवानगी नाही. त्यामुळे अनेकदा खेळाडू सोशल मीडियावर या काळात सक्रिय असल्याचे दिसले आहेत. अनेकजण काही जूने व्हिडिओ, फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात. नुकताच असाच एक गमतीशीर जुना व्हिडिओ स्म्रीती मंधनाने शेअर केला आहे.
स्म्रीतीने शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये दिसते की ती भारतीय महिला खेळाडूंबरोबर असताना अंडा-भूर्जी बनवत आहे. त्याचवेळी भारतीय संघातील काही खेळाडू तिच्या जवळ येतात. यात हरमनप्रीत कौरही दिसत आहे. तिच्यात आणि स्म्रीतीमध्ये यावेळी गमतीशीर संभाषण झालेलेही या व्हिडिओतून ऐकू येते.
हरमनप्रीत तिला म्हणते की ‘तू बनवत आहेस की जाळत आहेस?’ त्यावर स्म्रीती तिला कुठे जळाले आहे, असेही विचारते. पुढे हरमनप्रीत म्हणते ‘हे ऑम्लेट आहे, भूर्जी नाही’. त्यावर स्म्रीती म्हणते ‘मला केवळ भूर्जीच बनवता येते’. तसेच या व्हिडिओतून आणखी काही खेळाडूंचे आवाजही येत आहे. कोणतरी मागून म्हणत आहे, ‘हे खाण्यासाठी लोक मरत आहेत.’ तर दुसरा आवाज येतो की ‘हे खाऊन लोक मरत असतील.’ हे सर्व ऐकून सर्वजणी हसतानाही दिसत आहेत.
या व्हिडिओला कॅप्शन देताना स्म्रीतीने लिहिले की ‘जेव्हा माझे संघसहकारी माझ्या हाताचं अन्न खाण्यासाठी मरत होते. मला माहित आहे की ते दिवस दूर नाहीत, जेव्हा सर्व गोष्टी सामान्य होतील. पण तोपर्यंत आपण सर्वांनी जबाबदारी घेऊ आणि नियमांचे पालन करु आणि ही लढाई लढू व यशस्वी होऊ.’
https://www.instagram.com/p/COfuIwphkKo/
स्म्रीतीच्या या व्हिडिओवर अनेक प्रतिक्रिया आल्या आहेत. हरमनप्रीतनेही प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की ‘पण तू फक्त तुझ्या स्वत:साठीच बनवते आणि कधीही आपलं अन्न कोणाशी शेअर करत नाही.’
भारतीय महिला संघ करणार इंग्लंड दौरा
लवकरच भारतीय महिला संघ इंग्लंड दौरा करणार आहे. जूनमध्ये भारतीय महिला संघाला इंग्लंड महिला संघाविरुद्ध १ कसोटी, ३ वनडे आणि ३ कसोटी सामन्यांची मालिका खेळायची आहे.
भारतीय महिला संघाच्या इंग्लंड दौऱ्याचे वेळापत्रक –
एकमेव कसोटी सामना – १६ ते १९ जून, ब्रिस्टोल
पहिला एकदिवसीय सामना – २७ जून, ब्रिस्टोल
दुसरा एकदिवसीय सामना – ३० जून, टॉन्टन
तिसरा एकदिवसीय सामना – ३ जुलै, वॉरेस्टर
पहिला टी२० सामना- ९ जुलै, नॉर्थॅम्प्टन
दुसरा टी२० सामना – ११ जुलै, होव
तिसरा टी२० सामना – १५ जुलै, चेम्सफोर्ड
महत्त्वाच्या बातम्या –
बाबर आझमचा ऐतिहासिक कारनामा! ठरला ‘असे’ करणारा पाहिलाच पाकिस्तानी कर्णधार
विराटच्या एका मेसेजची कमाल अन् हर्षल पटेल बनला आयपीएल २०२१ मध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज
भारताच्या श्रीलंका दौर्याला १३ जुलै रोजी होणार सुरवात, ‘असे’ आहे संपूर्ण वेळापत्रक