भारताची स्टार महिला क्रिकेटपटू स्म्रीती मानधनाने ( Smriti Mandhana) ‘आयसीसी महिला वनडे क्रिकेटर ऑफ इयर’ 2024चा पुरस्कार पटकावला. सोमवार (27 जानेवारी) रोजी आयसीसीने स्म्रीती मानधनाची या पुरस्कारासाठी निवड केली. मानधनाने ‘महिला वनडे क्रिकेटर ऑफ द इयर’ 2024 हा पुरस्कार जिंकला. 27 वर्षीय डावखुरी फलंदाज मानधनाने 2024मध्ये धमाकेदार खेळी करून महिला वनडे क्रिकेटर ऑफ द इयर पुरस्कारावर आपले नाव कोरले.
तिने भारतीय संघासाठी 13 वनडे सामने खेळले आहेत. त्यामध्ये तिने 747 धावा केल्या. यादरम्यान तिने 3 अर्धशतकांसह 4 शतके झळकावली आहेत. याशिवाय मानधनाने 3 सामन्यांत गोलंदाजी करून 1 विकेट देखील आपल्या नावावर केली.
हा पुरस्कार जिंकून मानधनाने जागतिक रेकाॅर्डची बरोबरी केली आहे. ‘महिला वनडे क्रिकेटपटू ऑफ द इयर’ पुरस्कार दोनदा जिंकणारी ती जगातील दुसरी खेळाडू ठरली. तिच्याशिवाय न्यूझीलंडची दिग्गज खेळाडू सुझी बेट्सने हा पुरस्कार दोनदा जिंकला आहे. 2018 मध्ये मानधनाने तिचा पहिला ‘आयसीसी महिला वनडे क्रिकेटर ऑफ द इयर’ पुरस्कार जिंकला. बेट्सने 2013 आणि 2016 मध्ये ‘आयसीसी महिला वनडे क्रिकेटर ऑफ द इयर’ पुरस्कार जिंकला होता.
SMRITI MANDHANA – ICC WOMEN’S ODI CRICKETER OF THE YEAR. 🇮🇳 pic.twitter.com/CID0LawNCM
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) January 27, 2025
आयसीसी महिला वनडे क्रिकेटर ऑफ द इयर पुरस्कार विजेत्यांची यादी-
स्टेफनी टेलर (वेस्ट इंडिज) – 2012
सुझी बेट्स (न्यूझीलंड) – 2013
सारा टेलर (इंग्लंड) – 2014
मेग लॅनिंग (ऑस्ट्रेलिया) – 2015
सुझी बेट्स (न्यूझीलंड) – 2016
एमी सॅटर्थवेट (न्यूझीलंड) – 2017
स्मृती मानधना (भारत) – 2018
एलिस पेरी (ऑस्ट्रेलिया) – 2019
लिझेल ली (दक्षिण आफ्रिका) – 2021
नॅट सायव्हर-ब्रंट (इंग्लंड) – 2022
चमारी अट्टापट्टू (श्रीलंका) – 2023
स्म्रीती मानधना (भारत) – 2024
महत्वाच्या बातम्या –
स्म्रीती मानधनाने पटकावला ‘आयसीसी महिला वनडे क्रिकेटर ऑफ इयर’ पुरस्कार…!
IND vs ENG; मोहम्मद शमीची भारताला गरज नाही? काय म्हणाले बीसीसीआय सूत्र
3 भारतीय गोलंदाज, ज्यांनी चॅम्पियन्स ट्राॅफीमध्ये एका सामन्यात दिल्या सर्वाधिक धावा