सुरत। भारतीय महिला विरुद्ध दक्षिण आफ्रिका महिला (India Women vs South Africa Women) संघात मंगळवारी(24 सप्टेंबर) पहिला टी20 सामना लालाभाई कॉन्ट्राक्टर स्टेडियमवर पार पडला. या सामन्यात भारतीय महिला संघाने 11 धावांनी विजय मिळवत 5 सामन्यांच्या टी20 मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.
भारताच्या या विजयाबरोबरच हा सामना स्टार फलंदाज स्म्रीती मंधनासाठीही (Smriti Mandhana) खास ठरला आहे. तिचा हा भारतासाठी सलग 50 वा आंतरराष्ट्रीय टी20 सामना होता. त्यामुळे ती सलग 50 आंतरराष्ट्रीय टी20 सामने खेळणारी पहिलीच भारतीय क्रिकेटपटू ठरली आहे.
याआधी पुरुष आणि महिला भारतीय क्रिकेटपटूंध्ये सलग 50 आंतरराष्ट्रीय टी20 सामने कोणालाही खेळता आले नव्हते. तसेच याआधी भारताकडून सर्वाधिक सलग टी20 सामने खेळण्याचा विक्रम हरमनप्रीत कौरच्या (Harmanpreet Kaur) नावावर होता. तिने जून 2009 ते एप्रिल 2014 दरम्यान सलग 49 टी20 सामने भारताकडून खेळले होते.
आता हा विक्रम स्म्रीतीच्या नावावर झाला आहे. स्म्रीतीने जूलै 2015 पासून आत्तापर्यंत सलग 50 टी20 सामने भारताकडून खेळले आहेत.
मंगळवारी पार पडलेल्या सामन्यात भारतीय महिला संघाने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 8 बाद 130 धावा करत दक्षिण आफ्रिकेच्या महिला संघाला विजयासाठी 131 धावांचे आव्हान दिले होते. भारताकडून हरमनप्रीत कौरने सर्वाधिक 43 धावांची खेळी केली. तर स्म्रीतीने 21 धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेकडून शब्निम इस्माइलने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या.
त्यानंतर दक्षिण आफ्रिकेच्या महिलांना 131 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना 19.5 षटकात सर्वबाद 119 धावाच करता आल्या. दक्षिण आफ्रिकेकडून मिग्नॉन डू प्रीजने सर्वाधिक 59 धावांची खेळी केली. भारताकडून दिप्ती शर्माने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –
–हरभजन, बुमराहलाही जे जमले नाही ते २२ वर्षीय दिप्ती शर्माने करुन दाखवले
–भारताकडून वयाच्या १५ व्या वर्षी पदर्पण करणारी कोण आहे शेफाली वर्मा?
–आपल्याला अशीही काही शिक्षा होईल याचा शेन वॉर्नने जन्मातही विचार केला नसेल !