---Advertisement---

पीएसएलकडे फिरवली पाठ; आता आयपीएलमध्ये गाजवणार मैदान! लखनऊ सुपर जायंट्सकडून खेळण्याचे संकेत

On: सोमवार, मार्च 16, 2026 8:26 PM
---Advertisement---

भारतात आयपीएल (IPL) आणि पाकिस्तानमध्ये फ्रँचायझी क्रिकेटच्या नवीन हंगामाची सुरुवात होणार आहे. २८ मार्चपासून आयपीएलला सुरुवात होत असतानाच, पाकिस्तान सुपर लीगचा (PSL) पहिला सामना २६ मार्च रोजी खेळला जाईल. दोन्ही लीगमध्ये जगातील स्टार परदेशी खेळाडू खेळताना दिसतील. मात्र, आयपीएलमुळे पीएसएलला आणखी एक मोठा धक्का बसणार आहे. पीएसएल सोडून आता आणखी एक स्टार खेळाडू आयपीएलमध्ये खेळण्याचे मन बनवत आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानच्या लीगला हुलकावणी देऊन हा खेळाडू लखनऊ सुपर जायंट्सच्या ताफ्यात सामील होण्याची शक्यता आहे. हा खेळाडू कोण आहे? चला जाणून घेऊया.

वेस्ट इंडिजचा स्टार गोलंदाज गुडाकेश मोती टी-२० विश्वचषक २०२६ संपल्यानंतर पाकिस्तान सुपर लीगचा भाग होणार होता. लाहोर कलंदर्सने त्याला १.१० कोटी पाकिस्तानी रुपयांमध्ये विकत घेतले होते. मात्र, ईएसपीएन क्रिकइन्फोने दिलेल्या माहितीनुसार, मोती याने आता या लीगधून आपले नाव मागे घेतले आहे. त्याच्या जागी संघाने दुनिथ वेल्लागेचा समावेश केला आहे. मध्यपूर्वेतील (Middle East) तणावामुळे हा खेळाडू आधीच भारतात अडकला होता आणि आता पुन्हा त्या संकटात पडू इच्छित नाही. पण ताज्या माहितीनुसार, तो आयपीएलमध्ये लखनऊचा भाग बनू शकतो.

श्रीलंकेचा फिरकी अष्टपैलू खेळाडू वानिंदू हसरंगा टी-२० विश्वचषक २०२६ दरम्यान जखमी झाला होता. तेव्हापासून तो क्रिकेटच्या मैदानापासून दूर आहे. आयपीएलच्या मिनी लिलावात लखनऊच्या संघाने हसरंगाला २ कोटी रुपयांना खरेदी केले होते. सोशल मीडियावर अशा चर्चा रंगल्या आहेत की, वानिंदू हसरंगाच्या जागी गुडाकेश मोतीचा संघात समावेश केला जाऊ शकतो. हसरंगासाठी मोती हा अगदी योग्य (Like-to-like) पर्याय ठरू शकतो.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---