सॉकर एड 2018चा सामना विश्व एकादश विरूध्द इंग्लंड हा येत्या 10 जूनला होणार आहे. हा सामना मॅंचेस्टर युनायटेडच्या ओल्ड ट्रॅफोर्ड स्टेडियम येथे खेळला जाणार आहे.
हा सामना द्विवार्षिक निधी उभारण्यासाठी फुटबॉलचे प्रसिध्द खेळाडू आणि प्रसिध्द व्यक्ती याच्यांत खेळला जातो. 24 मिलीयन पौंड निधी गोळा करण्यासाठी या सामन्याला दहा वर्षापूर्वी सुरूवात झाली.
हा निधी उभारणारे सह-संस्थापक आणि युनिसेफ युनायटेड किंग्डमचे अॅम्बसडर रॉबी विल्यम्स हे इंग्लड संघाचे कर्णधार तर आॅलंपिक सुवर्ण पदक विजेता उसेन बोल्ट हा सॉकर एड विश्व एकादश या संघाचा कर्णधार आहे.
A game like no other, #SoccerAid 2018. ⚽️
Sunday 6.30pm @ITV @SoccerAid @Unicef_UK pic.twitter.com/sP7EZVHJ4z— ITV (@ITV) June 5, 2018
आॅलंपिकचे महान खेळाडू सर मो फराह आणि उसेन बोल्ट हे या सामन्यात आमने-सामने येणार आहेत. मॅंचेस्टर युनायटेडचे माजी खेळाडू मायकल ओवेन, एडविन वॅन डर सार, फिल नेविल आणि इरिक कॅन्टोना हे पण या सामन्यात सहभागी होणार आहे.
https://twitter.com/KP24/status/1001386703486152704
हा सॉकर एडचा सातवा सामना आहे. आधीच्या 6 सामन्यांपैकी इंग्लंडने चार तर विश्व एकादश संघाने दोन वेळा सामने जिंकले आहेत.
इंग्लडचा संघ –
रॉबी विल्यम्स (कर्णधार), सर मो फराह, आली मुर्स, पॅडी मॅक जिनीअस, जोइ विक्स, मायकल ओवेन, जेमी रेडॉनॉप, बेन शेफर्ड, मार्क राईट, वेस ब्राउन, ली मॅक, रॉबी फ्लॉवर, फ्रेडी फ्लिन्टॉफ, माइल्स स्टिफनसन, ब्रॅडली वॉल्श, फिल नेविल, डॅनी मर्फी, डॅमियन लेविस, डेव्हिड सेमन, डेव्हिड हॅरेवूड, बिली विंग्रोव
विश्व एकादश –
उसेन बोल्ट (कर्णधार), गॉर्डन रामसे, क्लारेन्स सीडॉर्फ, रॉबर्ट पेरेस, याया टाऊरे, ब्रेन्डन कोले, एडविन वॅन डर सार, पॅट्रिक क्लूवेर्ट, केविन पीटरसन, डॅन कार्टर, इरिक कॅन्टोना, अश्ले फोंगो, जाप स्टॅम, मार्टिन कॉम्पस्टोन, आयओएन ग्रुफुड, जेरेमी लिंच, निक बायर्न