अर्जेंटीनाचा माजी फुटबॉलपटू दिएगो मॅरेडोनाने अर्जेंटीना संघाला एकही पैसा न घेता प्रशिक्षण देण्याचा प्रस्ताव मांडला आहे.
2010च्या फिफा विश्वचषकात त्यांनी प्रशिक्षकपद सांभाळले आहे. दक्षिण आफ्रिकेत झालेल्या या 19व्या फिफा विश्वचषकात अर्जेंटीना उपांत्यपूर्व फेरीत पोहचला होता.
यावर्षीच्या फिफा विश्वचषकाच्या बाद फेरीत अर्जेंटीनाचा संघ फ्रान्सकडून 4-3 असा पराभूत झाला. यामुळे ते फिफामधून बाहेर पडले.
सध्या अर्जेंटीना संघाचे प्रशिक्षक जोर्ज सॅम्पाउली आहेत. त्यांचा कार्यकाल 2022 पर्यंत आहे.
“हो मला नक्कीच अर्जेंटीनाचे प्रशिक्षण पुन्हा एकदा करायला आवडेल. ते ही कोणतीही रक्कम न घेता,” असे मॅरेडोना एका टिव्ही-शोमध्ये बोलत होता.
बोका ज्युनियर्स आणि नापोली या संघाचा खेळाडू असलेल्या मॅरेडोनाने 2010मध्ये अर्जेंटीना संघाचे प्रशिक्षण करताना त्यांचा संघ उपांत्यपूर्व फेरीत जर्मनीकडून 4-0 अशा मोठ्या फरकाने पराभूत झाला होता.
1986ला अर्जेंटीनाने फिफा विश्वचषक जिंकला तेव्हा मॅरेडोनाकडे कर्णधारपद होते. तसेच त्यांनी युनाइटेड अरब अमिरातीमधील दोन फुटबॉल क्लबचे प्रशिक्षकपद सांभाळले आहे.
रशियात सुरू असलेल्या या स्पर्धेत सामना जिंकल्यानंतर मॅरेडोनाने खूप विचित्र हावभाव केले होते. जसे की, चाहत्यांकडे बोटे करणे अथवा वेगवेगळ्या पोझमध्ये फोटो काढणे. तसेच यावेळी त्याला कमी ब्लडप्रेशरचा त्रास झाल्याने डॉक्टरचे पथकही आले होते.
“लोकांना असे वाटते की खूप खूष आहे पण माझे हृद्य कमजोर आहे,” असे तो म्हणाला.
“मला असे वाटते की, एवढ्या कष्टाने आम्ही आमचे स्थान प्राप्त केले होते पण ते आता हळूहळू खाली जात आहे,” असेही मॅरेडोना यावेळी म्हणाला.
महत्त्वाच्या बातम्या-
–वडिलांचे अपहरण झालेले असतानाही तो मैदानावर देशासाठी लढला
–विश्वचषकातून बाहेर पडलेल्या या संघाचे जगातभरात कौतूक…