मुंबई। आयपीएल 2022चा कप गुजरात टायटन्सच्या नावे झाला आहे. तब्बल सहा वर्षांनी आयपीएलला नवा चॅम्पियन मिळाला आहे. IPL 2022 मध्ये पहिल्यांदाच खेळणारा संघ गुजरात टायटन्स क्रिकेटची लोकप्रिय लीग असलेल्या आयपीएलची एकदम नवीकोरी चॅम्पियन बनली आहे. नवा संघ आणि नवा कप्तान हार्दिक पंड्याने पहिल्याच प्रयत्नात इतिहास रचला. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये खेळलेल्या फायनल आयपीएल 2022 सामन्यात गुजरात टायटन्सने राजस्थान रॉयल्सला 7 विकेट्सने पराभूत करत हा खिताब आपल्या नावावर केला आहे.
सन 2008मध्ये पहिल्यांदा राजस्थान रॉयल्सने (Rajasthan Royals) आयपीएलचा किताब आपल्या नावे केला होता. मात्र, यंदा सामना खूपच रोमांचक होता. राजस्थान रॉयल्ससाठी विजय मिळवणे सोपे नव्हते. कारण, गुजरात टायटन्सची (Gujarat Titans) आतापर्यंतची कामगिरी खूपच चांगली होती.
सोशल मीडियावर चाहते आणि अनेक आजी-माजी क्रिकेटपटूंनी गुजरात टायटन्सच्या (Gujarat Titans) विजयाचा उत्सव साजरा केला आणि संघाचे अभिनंदन केले. या आहेत काही निवडक शुभेच्छा-
सामन्याचा आढावा
गुजरात समोर राजस्थानने १३१ धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग गुजरातने १८.१ षटकांत ३ विकेट्स गमावत पूर्ण केला आणि पहिल्याच आयपीएल हंगामात विजेतेपद आपल्या नावावर केले. विशेष म्हणजे यापूर्वी असा विक्रम केवळ राजस्थान रॉयल्सने केला होता. राजस्थानने २००८ साली पहिल्याच आयपीएल हंगामात विजेतेपद जिंकले होते.
गुजरातकडून १३१ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना शुबमन गिलने सर्वाधिक ४५ धावा केल्या. तसेच कर्णधार हार्दिक पंड्याने ३४ धावा केल्या. याशिवाय डेव्हिड मिलरने ३२ धावांची खेळी केली. या सामन्यात सुरुवातीला राजस्थान रॉयल्सच्या गोलंदाजांनी गुजरातवर वर्चस्व ठेवण्याचा प्रयत्न केला होता. पण हार्दिक आणि शुबमन यांनी ६३ धावांची भागीदारी रचली आणि गुजरातला विजयाच्या दिशेने नेले.
विशेष गोष्ट अशी की, गिलला २ वेळा जीवदानही मिळाले. त्याचा पहिला झेल युजवेंद्र चहलने सोडला, तर दुसरा झेल शिमरॉन हेटमायरने सोडला. या जीवदानाचा फायदा घेत शुबमनने गुजरातला विजय मिळवून दिला. राजस्थानकडून गोलंदाजीत ट्रेंट बोल्ट, युजवेंद्र चहल आणि प्रसिद्ध कृष्णा यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
महा स्पोर्ट्चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
आयपीएल जिंकणारा हार्दिक चौथाच भारतीय कर्णधार; पाहा आयपीएल विजेत्या संघनायकांची संपूर्ण यादी
‘कॅप्टन लिडिंग फ्रॉम फ्रँट’चं उदाहरण आहे हार्दिक पंड्या; गंभीर, रोहितनंतर केलीय ‘ही’ कमाल
राजस्थानच्या जुन्या खेळाडूनेच केला ‘रॉयल्स’चा घात, अंतिम सामन्यात चोप चोप चोपले