पुणे | ई2डी स्पोर्ट्स यांच्या तर्फे आयोजित ई2डी कॉर्पोरेट क्रिकेट लीग स्पर्धेत अंतिम फेरीत श्रीकांत कासार(35धावा व 3-23) याने केलेल्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर सॉफ्टहार्ड ऑटोमेशन संघाने रिग्रीन एन्टरप्रायझेस संघाचा 68 धावांनी पराभव करून विजेतेपद संपादन केले.
लवळे येथील ई2डी क्रिकेट मैदानावर पार पडलेल्या या स्पर्धेत अंतिम फेरीच्या सामन्यात सॉफ्टहार्ड ऑटोमेशन संघाने प्रथम फलंदाजी करताना 20षटकात 7बाद 178धावा केल्या. यात श्रीकांत कासारने 35धावा, अजित गव्हाणेने 28धावा, अमित कदमने 25धावा, प्रफुल मानकरने 25धावा, स्वप्निल चिखलेने नाबाद 24धावा व कुमार ठक्करने नाबाद 19धावा काढून संघाच्या डावाला आकार दिला.रिग्रीनकडून शरद शिंदे 2-48, संदीप जगताप 2-15 यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. या आव्हानाचा पाठलाग करताना रिग्रीन एन्टरप्रायझेस संघाचा डाव 17 षटकात 110धावावर संपुष्टात आला. यात लक्ष्मण अटकरे नाबाद 23, संदीप जगताप 21, शरद शिंदे 20, शैलेंद्र कसबे 15 यांनी दिलेली लढत अपुरी ठरली. सॉफ्टहार्ड ऑटोमेशनकडून अभिजित जगताप(3-14), श्रीकांत कासार(3-23) यांनी प्रत्येकी तीन गडी बाद संघाच्या विजयाचा पाया रचला. सामनावीर हा ‘किताब श्रीकांत कासार याला देण्यात आला.
तिसऱ्या व चौथ्या क्रमांकासाठी झालेल्या लढतीत हुझेफा पूनावाला(3-12) याने केलेल्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर बुर्हानी प्रायव्हेट लिमिटेड संघाने इक्यु टेक्नॉंलॉजीकचा 4 गडी राखून पराभव करत तिसरा क्रमांक पटकावला.
स्पर्धेतील विजेत्या सॉफ्टहार्ड ऑटोमेशन संघाला करंडक व 41हजार रुपये, तर उपविजेत्या रिग्रीन एन्टरप्रायझेस संघाला करंडक व 31 हजार रुपये अशी पारितोषिके देण्यात आली. स्पर्धेचे पारितोषिक वितरण पुणे जिल्हा परिषद सदस्य शंकर मांडेकर यांच्या हस्ते करण्यात आले.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: अंतिम फेरी:
सॉफ्टहार्ड ऑटोमेशन: 20षटकात 7बाद 178धावा(श्रीकांत कासार 35(30, 5×4), अजित गव्हाणे 28(22,2×4), अमित कदम 25(17), प्रफुल मानकर 25(22), स्वप्निल चिखले नाबाद 24(11), कुमार ठक्कर नाबाद 19(9), शरद शिंदे 2-48, संदीप जगताप 2-15, संजय देसाई 1-20, शाहबाज सय्यद 1-39)वि.वि.रिग्रीन एन्टरप्रायझेस: 17 षटकात सर्वबाद 110धावा(लक्ष्मण अटकरे नाबाद 23(14), संदीप जगताप 21(24), शरद शिंदे 20(20), शैलेंद्र कसबे 15(16), अभिजित जगताप 3-14, श्रीकांत कासार 3-23, केतन पासलकर 2-33, वैभव आगरकर 1-15);सामनावीर-श्रीकांत कासार;
तिसऱ्या व चौथ्या क्रमांकासाठी: इक्यु टेक्नॉंलॉजीक: 20षटकात 8बाद 124धावा(विशाल शिंदे 53(55,7×4), दर्शन शाह 16(21), अविनाश 14(15), अमर गजभीये नाबाद 13, हुझेफा पूनावाला 3-12, अब्देअली मोटरवाला 2-26)पराभूत वि.बुर्हानी प्रायव्हेट लिमिटेड: 18षटकात 6बाद 128धावा(मोहम्मद लोखंड 26(25,4×4), मोहित श्रीवास्तव नाबाद 25(10,2×4,2×6), अली जेपी 24(23,5×4), हुझेफा पूनावाला 14, अमर गजभीये 4-21);सामनावीर- हुझेफा पूनावाला
इतर पारितोषिके:
सर्वोत्कृष्ट फलंदाज: अजित गव्हाणे(181धावा);
सर्वोत्कृष्ट गोलंदाज: केतन पासलकर(11 विकेट);
मालिकावीर: इर्शाद शेख(123 धावा व 7 विकेट).
महत्त्वाच्या बातम्या-
–टीम इंडियाकडून अजून एकही सामना न खेळलेल्या खेळाडूचे विराट कोहलीने केले कौतुक
–टीम इंडियाकडून यशस्वी पुनरागमन केल्यानंतर हार्दिक पंड्याने मानले आभार
–९ वर्षानंतर रोहित शर्माच्या बाबतीत घडली ही नकोशी गोष्ट