पाकिस्तान क्रिकेट संघाचा टी-20 स्पेशलिस्ट गोलंदाज सोहेल तनवीर आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांमधून निवृत्त झाला आहे. सोहेलने त्याच्या अधिकृत सोशल मीडिया खात्यावरून सोमवारी (6 मार्च) रात्री हा निर्णय चाहत्यांना कळवला. सोहेल पाकिस्तानच्या विश्वचषक विजेत्या संघाचा भाग राहिला आहे. त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 100 पेक्षा अधिक विकेट्सही नावावर केल्या आहेत.
पाकिस्तान संघाचा हा 38 वर्षीय वेगवान गोलंदाज मागच्या मोठ्या काळापासून संघातून बाहेर होता. 2017 साली सोहेल तनवीर (Sohail Tanveer) पाकिस्तान संघासाठी शेवटचा सामना खेळला होता. वेस्ट इंडीजविरुद्धच्या या सामन्यात सोहेलने एक विकेट घेतली होती, पण तीन षटकांमध्ये तब्बल 40 धावा खर्च केल्या होत्या. सोहेलच्या नावावर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकूण 130 विकेट्सची नोंद आहे. 2009 साली पाकिस्तान संघाने जिंकलेल्या टी-20 विश्वचषकात देखील त्याची भूमिका महत्वाची राहिली आहे.
Announcement: I am retiring from all formats of international cricket and will continue to play domestic and franchise cricket going forward. Thank you to @TheRealPCB for giving me the opportunity to play for my country ????????
— Sohail Tanveer (@sohailmalik614) March 6, 2023
सोमवारी रात्री सोहेलने अधिकृत ट्वीटर खात्यावरून पोस्ट केली की, “मी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेत आहे. देशांतर्गत फ्रँचायझी क्रिकेटमध्ये मात्र मी पुढेही खेळत राहील. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे धन्यवाद, ज्यांनी मला देशासाठी खेळण्याची संधी दिली.”
सोहलने त्यांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत कसोटी आणि टी-20 फॉरमॅटपेक्षा जास्त वनडे सामने खेळले. त्याने 63 वनडे सामन्यांमध्ये 71 विकेट्स नावावर केल्या. टी-20 फॉरमॅटमध्ये त्याने 57 सामने खेळले, ज्यात 54 विकेट्स घेतल्या. कसोटी फॉरमॅटमध्ये त्याला फक्त 2 सामन्यांमध्ये खेळण्याची संधी मिळाली, ज्यात 5 विकेट्स घेतल्या.
(Sohail Tanveer announced his retirement from international cricket)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
वाढदिवस विशेष: जेव्हा विवियन रिचर्ड्स यांनी कराचीतील मैदानावर आणले होते तुफान
ना गेल ना पोलार्ड! एबीला हा 24 वर्षाचा अष्टपैलू वाटतो सर्वोत्तम टी20 खेळाडू, कारण देत म्हणाला…





