सध्या क्रिकेट जगतात टी20 क्रिकेट सर्वाधिक खेळले जाते. जगभरातील जवळपास सर्वच देशांमध्ये आपापली व्यावसायिक टी20 लीग खेळली जाते. या सर्व लीगमध्ये अनेक दिग्गज क्रिकेटपटू खेळताना दिसतात. यापैकीच एक असलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या एबी डिव्हिलियर्स याने एका मुलाखतीत बोलताना आपल्या ऑल टाईम ग्रेट टी20 खेळाडूचे नाव जाहीर केले.
दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार राहिलेला एबी डिव्हिलियर्स नुकताच एका कार्यक्रमात बोलत होता. त्यावेळी त्याला आत्तापर्यंतचा सर्वोत्तम टी20 खेळाडू कोण आहे असा प्रश्न विचारला गेला. यावर त्याने अत्यंत अनपेक्षित नाव घेतले. तो म्हणाला,
“टी20 क्रिकेटमध्ये आत्तापर्यंत अनेक दिग्गज क्रिकेटपटू होऊन गेले आहेत. मात्र, मला विचाराल तर टी20 क्रिकेटचा ऑल टाइम ग्रेट क्रिकेटपटू राशिद खान आहे. तो सामन्यात प्रत्येक वेळी खेळाच्या तीनही विभागात योगदान देताना दिसतो. गोलंदाजीण तो सर्वोत्तम आहेच. फलंदाजीतही गरज पडते तेव्हा त्याच्याकडून धावा होत असतात. क्षेत्ररक्षण करताना त्याचा उत्साह निराळाच वाटतो. माझ्यासाठी तर तोच सर्वोत्कृष्ट आहे.”
अफगाणिस्तानसाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा राशिद टी20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक मागणी असलेला क्रिकेटपटू आहे. केवळ 24 वर्षांच्या असलेल्या राशिदने 2015 मध्ये व्यावसायिक क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली होती. त्याने आत्तापर्यंत 382 टी20 सामने खेळताना तब्बल 617 बळी मिळवले आहेत. तसेच, फलंदाजीत देखील योगदान देताना त्याने 1800 पेक्षा जास्त धावा जमवल्या. टी20 क्रिकेटचा विचार केल्यास ब्रेंडन मॅकलम, ख्रिस गेल, ड्वेन ब्राव्हो व कायरन पोलार्ड या खेळाडूंचा दिग्गज म्हणून विचार केला जातो.
(AB de Villiers Named Rashi Khan As T20 Greatest Of All Time Cricketer)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
दक्षिण आफ्रिका क्रिकेटमध्ये नवी सुरुवात! युवा खेळाडूकडे नेतृत्व, तर दिग्गजाकडे प्रशिक्षकपद
बांगलादेशने केला अपसेट! विश्वविजेत्या इंग्लंडवर दणदणीत मात, शाकिबची अष्टपैलू कामगिरी