Monday, March 27, 2023
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

दक्षिण आफ्रिका क्रिकेटमध्ये नवी सुरुवात! युवा खेळाडूकडे नेतृत्व, तर दिग्गजाकडे प्रशिक्षकपद

March 6, 2023
in क्रिकेट, टॉप बातम्या
South-Africa

Photo Courtesy: Twitter/ICC


दक्षिण आफ्रिका क्रिकेटमध्ये मागील काही काळापासून मोठ्या प्रमाणात बदलाचे वारे वाहत आहे. टी20 विश्वचषकातील संघाच्या पराभवानंतर कर्णधार टेंबा बवुमा याने राजीनामा दिला होता. त्यानंतर आता जवळपास चार महिन्यानंतर दक्षिण आफ्रिका संघाला नवा टी20 कर्णधार मिळाला आहे. वेस्ट इंडीज विरुद्धच्या टी20 मालिकेसाठी संघाची नुकतीच घोषणा करण्यात आली. यामध्ये ऐडन मार्करम याच्याकडे पुन्हा एकदा संघाचे नेतृत्व देण्याचा निर्णय घेतला गेला.

काही दिवसांपूर्वीच बवुमा याने आपल्या टी20 कर्णधारपदाचा राजीनामा दिला होता. तर, डीन एल्गर याला कसोटी कर्णधारपदवरून हटवले गेलेले. त्यामुळे कसोटी व वनडे संघाचे नेतृत्व बवुमा करणार हे जाहीर करण्यात आलेले. आता मार्करम याच्याकडे टी20 संघाचे नेतृत्व देऊन दक्षिण आफ्रिका क्रिकेटमध्ये नवी सुरुवात करण्यात आल्याचे सांगितले गेले.

PROTEAS T20I SQUAD ANNOUNCEMENT 🚨

🫡 Aiden Markram appointed captain
🏏 JP Duminy announced as permanent white-ball batting coach

All the details 🔗 https://t.co/ezqnfV3J8m#SAvWI #BePartOfIt pic.twitter.com/j9k0dlq9jc

— Proteas Men (@ProteasMenCSA) March 6, 2023

 

मार्करम हा मागील काही काळापासून जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. फलंदाज म्हणून देखील त्याची कामगिरी सर्वोत्तम होतेय. त्याच्या नेतृत्वात सनरायझर्स ईस्टर्न केप संघाने पहिल्या एसए टी20 लीग स्पर्धेचे विजेतेपद आपल्या नावे केले. तसेच आगामी आयपीएलमध्ये देखील तो सनरायझर्स हैदराबाद संघाचे कर्णधारपद भूषवताना दिसणार आहे.

यासोबतच दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज क्रिकेटपटू जेपी डुमिनी याला संघाचा नियमित फलंदाजी प्रशिक्षक म्हणून घोषित करण्यात आले. तो वनडे व टी20 मालिकांवेळी संघाला मार्गदर्शन करेल. दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डाने कसोटी संघाचे मुख्य प्रशिक्षकपद शुकरी कोनरॉड व मर्यादित शिक्षकांच्या संघाचे मुख्य प्रशिक्षकपद रॉब वॉल्टर्स हे सांभाळतील.

वेस्ट इंडीजविरुद्धच्या टी20 मालिकेसाठी दक्षिण आफ्रिका संघ-

ऐडन मार्कराम (कर्णधार), क्विंटन डी कॉक, ब्योर्न फोर्टुइन, रीझा हेंड्रिक्स, मार्को जेन्सन, हेन्रिक क्लासेन, सिसांडा मॅगाला, डेव्हिड मिलर, लुंगी एन्गिडी, एन्रिक नोर्कीए, वेन पार्नेल, कागिसो रबाडा, रायली रूसो, तबरेझ शम्सी, ट्रिस्टन स्टब्स.

(Aiden Markram Announced As South Africa New T20 Captain JP Duminy White Ball Batting Coach)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
वनडे मालिकेतून बाहेर पडला ‘हा’ ऑस्टेलियन गोलंदाज, बुमराहनंतर मुंबई इंडियन्ससाठी दुसरा मोठा धक्का
VIDEO: मुंबईच्या रस्त्यावर सूर्याने खेळला ‘सुपला शॉट’! व्हिडिओ होतोय तुफान व्हायरल, तुम्ही पाहिला का?


Next Post
Photo Courtesy: Twitter/ICC

बांगलादेशने केला अपसेट! विश्वविजेत्या इंग्लंडवर दणदणीत मात, शाकिबची अष्टपैलू कामगिरी

Photo Courtesy: Twitter/IPL

ना गेल ना पोलार्ड! एबीला हा 24 वर्षाचा अष्टपैलू वाटतो सर्वोत्तम टी20 खेळाडू, कारण देत म्हणाला...

Photo Courtesy: Twitter/WPL

मॅथ्यूज-सिव्हरच्या दणक्याने आरसीबीची धूळधाण! मुंबईचा WPL मध्ये सलग दुसरा विजय

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143