Friday, March 31, 2023
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

बांगलादेशने केला अपसेट! विश्वविजेत्या इंग्लंडवर दणदणीत मात, शाकिबची अष्टपैलू कामगिरी

March 6, 2023
in क्रिकेट, टॉप बातम्या
Photo Courtesy: Twitter/ICC

Photo Courtesy: Twitter/ICC


बांगलादेश आणि इंग्लंड यांच्याविरुद्धच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील अखेरचा सामना सोमवारी (6 मार्च) खेळला गेला. यापूर्वीच मालिका आपल्या नावे केलेल्या इंग्लंडला या सामन्यात मात्र पराभवाचा धक्का बसला. बांगलादेशने उत्कृष्ट सांघिक खेळ दाखवत इंग्लंडला 50 धावांनी नमवले. बांगलादेशसाठी अनुभवी अष्टपैलू शाकिब अल हसन याने अष्टपैलू खेळ दाखवला.

Bangladesh avoid an ODI series whitewash against England with a brilliant all-round showing 👌#BANvENG | #CWCSL | 📝: https://t.co/hCbNscGMzo pic.twitter.com/coSI53oR46

— ICC (@ICC) March 6, 2023

 

चट्टोग्राम येथे झालेल्या या सामन्यात बांगलादेशचा कर्णधार तमिम इक्बाल याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र, तमिम व लिटन दास हे दोन्ही सलामीवीर 17 धावांमध्ये तंबूत परतले. मात्र, त्यानंतर शांतो व रहीम यांनी संघाला संकटातून बाहेर काढले. दोघांनी तिसऱ्या गड्यासाठी 98 धावांची भागीदारी केली. शांतोने 53 तर रहीमनै 70 धावा केल्या. त्यानंतर आलेल्या शाकिबने डावाची सूत्रे आपल्या हाती घेतली. त्याने 75 धावांची खेळी करत बांगलादेश संघाला 246 धावांपर्यंत पोहोचवले. इंग्लंडसाठी वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर याने सर्वाधिक तीन तर, रशीद व करन यांनी प्रत्येकी दोन बळी मिळावले.

मालिका क्लीन स्वीप करण्याच्या इराद्याने फलंदाजीला उतरलेल्या इंग्लंडला सुरुवातीपासून या धावांचा पाठलाग करताना संघर्ष करावा लागला. सलामीवीरांनी 54 भावांची भागीदारी केल्यानंतरही पुढील दोन धावात त्यांना तीन बळी गमवावे लागले. इंग्लंडसाठी जेम्स विन्स व जोस बटलर हे चांगल्या सुरुवातीचा फायदा उठवू शकले नाहीत. ख्रिस वोक्स याने 34 धावांचे योगदान दिले. तळाचे फलंदाज अपयशी ठरल्याने इंग्लंडला 50 धावांनी पराभूत व्हावे लागले. बांगलादेशसाठी शाकिबने सर्वाधिक चार बळी आपल्या नावे केले. त्याला या अष्टपैलू कामगिरीसाठी सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. तर, इंग्लंडचा फिरकीपटू आदिल रशीद हा मालिकावीर ठरला.

Bangladesh Beat England By 50 Runs In 3rd ODI Shakib Shines

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
वनडे मालिकेतून बाहेर पडला ‘हा’ ऑस्टेलियन गोलंदाज, बुमराहनंतर मुंबई इंडियन्ससाठी दुसरा मोठा धक्का
VIDEO: मुंबईच्या रस्त्यावर सूर्याने खेळला ‘सुपला शॉट’! व्हिडिओ होतोय तुफान व्हायरल, तुम्ही पाहिला का?


Next Post
Photo Courtesy: Twitter/IPL

ना गेल ना पोलार्ड! एबीला हा 24 वर्षाचा अष्टपैलू वाटतो सर्वोत्तम टी20 खेळाडू, कारण देत म्हणाला...

Photo Courtesy: Twitter/WPL

मॅथ्यूज-सिव्हरच्या दणक्याने आरसीबीची धूळधाण! मुंबईचा WPL मध्ये सलग दुसरा विजय

Photo Courtesy: Twitter/ICC

वाढदिवस विशेष: जेव्हा विवियन रिचर्ड्स यांनी कराचीतील मैदानावर आणले होते तुफान

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143