---Advertisement---

WMPL 2025: सोलापूरचा विजयरथ सुसाट! रायगडच्या पराभवाचा सिलसिला सुरूच

---Advertisement---

वुमेन्स महाराष्ट्र प्रिमियर लीगमध्ये बुधवारी (11 जून) दुसरा सामना सोलापूर स्मॅशर्स विरुद्ध रायगड रॉयल्स असा खेळला गेला.‌ यापूर्वीच अंतिम सामन्यात जागा बनवलेल्या सोलापूर स्मॅशर्स संघाने पुन्हा एकदा आपला दबदबा दाखवत रायगडला पराभूत केले. सोलापूरसाठी दोन्ही सलामी फलंदाजांनी शानदार अर्धशतके झळकावली.

सोलापूर स्मॅशर्स संघासाठी या सामन्याची सुरुवात शानदार झाली. त्यांच्या दोन्ही सलामी फलंदाज ईश्वरी अवसरे व ईश्वरी सावकार यांनी पहिल्या विकेटसाठी 96 धावा जोडल्या. ईश्वरी अवसरे हिने बाद होण्यापूर्वी 44 चेंडूंमध्ये 52 धावा केल्या.‌‌ यामध्ये सहा चौकार व तीन षटकारांचा समावेश होता. दुसरी सलामी फलंदाज ईश्वरी सावकार हिने आपला फॉर्म कायम राखत 14 चौकारांच्या मदतीने 53 चेंडूंमध्ये 78 धावांची खेळी केली. तर, शाल्मली क्षत्रिय हिने 23 चेंडूत नाबाद 32 धावांचे योगदान दिले. या सर्व फलंदाजांच्या योगदानामुळे संघाने 169 अशी मोठी मजल मारली.

विजयासाठी मिळालेल्या 170 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना रायगडची कर्णधार किरण नवगिरे हिने केवळ सात चेंडू 18 धावा केल्या.‌ प्रज्ञा वीरकर व यशोदा घोगरे यांना चांगली सुरुवात मिळूनही त्या मोठी धावसंख्या उभारू शकल्या नाहीत. मधल्या फळीतील आयेशा शेख हिने 25 चेंडूत 41 धावा केल्या. संपूर्ण 20 षटके फलंदाजी केल्यानंतरही, रायगड संघाला 149 पर्यंतच मजल मारता आली. सोलापूरसाठी आरती केदार, मुक्ता मगरे व शरयू कुलकर्णी यांनी प्रत्येकी दोन बळी टिपले. सलग दुसऱ्या सामन्यात ईश्वरी सावकार सामन्याची मानकरी ठरली.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---