---Advertisement---

सोलापूरात WMPL 2025 ची ट्रॉफी नेणार का स्मॅशर्स? असा केला फायनलपर्यंत प्रवास

---Advertisement---

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन यांनी आयोजित केलेल्या पहिल्यावहिल्या वुमेन्स महाराष्ट्र प्रिमियर लीग स्पर्धेचा अंतिम सामना शनिवारी (14 जून) रोजी होणार आहे. गहूंजे येथील आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर होणाऱ्या या अंतिम सामन्यात पुणे वॉरियर्स आणि सोलापूर स्मॅशर्स हे गुणतालिकेत पहिल्या दोन क्रमांकावर राहिलेले संघ भिडतील. अनेकांनी विजेतेपदासाठी पसंती दिलेल्या सोलापूर स्मॅशर्स संघाचा या स्पर्धेतील आत्तापर्यंतचा प्रवास कसा राहिला, आपण हे जाणून घेऊया.

भारतीय संघाची फलंदाज तेजल हसबनीस तिच्या नेतृत्वात सोलापूर स्मॅशर्स संघाने डब्ल्यूएमपीएल 2025 मध्ये आपले आव्हान सादर केले. स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात त्यांना पराभव पत्करावा लागला. पुणे वॉरियर्सविरूद्ध 149 धावा उभारल्यानंतरही त्यांना या धावांचा बचाव करता आला नाही. परिणाम, पाच विकेट्सने त्यांचा पराभव झाला. दुसऱ्या सामन्यात त्यांची गाठ रत्नागिरी जेट्स संघाशी पडली. गोलंदाजांनी उत्कृष्ट गोलंदाजी करत रत्नागिरीला 120 धावांवर रोखले. या धावांचा पाठलाग करताना कर्णधार तेजल हसबनीस हिने 43 धावांची खेळी करत आपल्या संघाला 4 षटके आधीच विजय मिळवून दिला.

हंगामातील तिसऱ्या सामन्यात त्यांच्यापुढे रायगड रॉयल्सचे आव्हान होते. मात्र, सोलापूरच्या गोलंदाजांनी आपली उपयुक्तता पुन्हा एकदा सिद्ध करत रायगडला 129 धावांच्या पुढे जाऊ दिले नाही. त्यानंतर पुन्हा एकदा कर्णधार तेजल हिने आक्रमक अर्धसतक ठोकले आणि आपल्या संघाच्या खात्यात विजयासह दोन गुण टाकले. चौथ्या सामन्यात रत्नागिरी जेट्स संघविरुद्ध त्यांनी अक्षरशः वर्चस्व गाजवले. ईश्वरी सावकार हिच्या 75 व तेजल हसबनीस हिच्या 70 धावांच्या जोरावर त्यांनी 170 इतकी मोठी धावसंख्या उभी केली. प्रत्युत्तरात लक्ष्मी यादव व मुक्ता मगरे यांच्या गोलंदाजी पुढे रत्नागिरी केवळ 151 धावा बनवण्यात यशस्वी ठरली. हा सामना 19 धावांनी जिंकत त्यांनी अंतिम फेरीतील आपली जागा पक्की केली.

रायगड रॉयल्सविरुद्ध हंगामातील पाचवा सामना खेळताना सोलापूर स्मॅशर्स संघाच्या सलामी फलंदाज ईश्वरी अवसरे व ईश्वरी सावकार यांनी अनुक्रमे 52 व 78 धावा केल्या. त्यांच्या योगदानामुळे संघाने 169 धावा बनवल्या. गोलंदाजांनी पुन्हा एकदा आपली दमदार कामगिरी करत संघाला 30 धावांनी विजय मिळवून दिला. हंगामातील अखेरच्या साखळी सामन्यात सोलापूर स्मॅशर्सला पुन्हा एकदा अपयश आले.‌ पुणे वॉरियर्सच्या चिन्मयी बोरफळे व अनुजा पाटील यांनी सोलापूरचा डाव केवळ 105 धावांवर संपवला. त्यानंतर सोलापूरच्या गोलंदाज या धावांचा बचाव करण्यात अपयशी ठरल्या.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---