सध्या भारतात आयपीएल 2023 चांगली रंगात आली आहे. अर्धी स्पर्धा संपल्यानंतर गुणतालिकेत मोठा संघर्ष पाहायला मिळतोय. जगातील सर्वात श्रीमंत व्यावसायिक टी20 लीग असलेल्या या स्पर्धेत खेळण्यासाठी अनेक प्रसिद्ध क्रिकेटपटू आतुर असतात. या सर्व पार्श्वभूमीवर आता एक खळबळजनक बातमी समोर येतेय. इंग्लंडच्या सहा क्रिकेटपटूंना त्यांचा वार्षिक करार मोडून केवळ आयपीएल फ्रॅंचाईजींसाठी खेळण्याचा प्रस्ताव देण्यात आल्याचे सांगितले जातेय.
सध्या आयपीएलमध्ये इंग्लंडचे अनेक प्रमुख खेळाडू खेळताना दिसत आहेत. इंग्लंडचे दोन्ही कर्णधार जोस बटलर व बेन स्टोक्स यांच्यासह जो रूट, मोईन अली, जोफ्रा आर्चर, लियाम लिव्हिंगस्टोन, सॅम करन व मार्क वूड हे खेळाडू विविध आयपीएल फ्रॅंचाईजीशी करारबद्ध आहेत. आता याच खेळाडूंपैकी काहींना त्यांच्या संघांनी राष्ट्रीय संघासोबत असलेला राष्ट्रीय करार मोडून, फ्रॅंचाईजीसाठी वर्षभर खेळण्याचा प्रस्ताव दिल्याचे सांगितले जाते.
एका आघाडीच्या भारतीय वृत्तसंस्थेने दिलेल्या बातमीनुसार, इंग्लंडच्या सहा खेळाडूंना अशा प्रकारची ऑफर दिली आहे. या बदल्यात खेळाडूंना करोडोंची रक्कम दिली जाईल. खेळाडूंनी या प्रस्तावा बाबत अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. काही दिवसांपूर्वी ऑस्ट्रेलियन खेळाडूंना देखील अशा प्रकारची ऑफर देण्यात आली होती.
सध्या जगभरात अनेक देशांमध्ये टी20 लीग खेळल्या जातात. बऱ्याच आयपीएल फ्रॅंचाईजीचे एकापेक्षा जास्त लीगमध्ये संघ उतरतात. उदाहरणार्थ, मुंबई इंडियन्स ही फ्रॅंचाईजी आयपीएलसह तीन अन्य लीगमध्ये आपला संघ खेळवते. चेन्नई सुपर किंग्स व राजस्थान रॉयल्स हे संघदेखील तीन देशांमध्ये संघमालक आहेत. आगामी काळात केवळ पैशांसाठी अनेक मोठे क्रिकेटपटू आपल्या देशाकडून खेळणे सोडतील, अशी भीती काही माजी क्रिकेटपटूंनी व्यक्त केली होती.
(Some IPL Franchise Offer Multi Million Pound Deal To Six English Cricketers To Quit International Cricket)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
सरफराजचं नशीब फळफळलं! WTC फायनलसाठी टीम इंडियात जागा, द्विशतक ठोकणाऱ्या ‘या’ 2 खेळाडूंचीही चांदी
डब्ल्यूटीसी फायनलसाठी गावसकरांनी निवडली भारताचा प्लेइंग इलेव्हन! 5 फलंदाज आणि 3 गोलंदाजांना संधी