दक्षिण अफ्रिका आणि भारत (sa vs ind odi series) यांच्यातील तिसरा एकदिवसीय सामना केपटाऊनमध्ये खेळला जात आहे. दक्षिण अफ्रिकेचा यष्टीरक्षक फलंदाज क्विंटन डी कॉक (Quinton de kock) याने या सामन्यात दक्षिण अफ्रिकेसाठी महत्वपूर्ण धावा केल्या. डी कॉकने १३० चेंडूत १२४ धावा ठोकल्या. या शतकी खेळीनंतर डी कॉकने काही विक्रम स्वतःच्या नावावर केले.
भारताविरुद्ध आतापर्यंत सर्वाधिक वेळा एकदिवसीय सामन्यात शतक करणाऱ्यांमध्ये डी कॉक आता दुसऱ्या क्रमांकावर आला आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारताविरुद्ध सर्वाधिक शतक करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत श्रीलंकेचे माजी क्रिकेटपटू सनथ जयसूर्या पहिल्या क्रमांकावर आहेत, त्यांनी भारताविरुद्ध खेळळेल्या एकदिवसीय सामन्यांतील ८५ डावांमध्ये ७ शतके ठोकली आहेत. डी कॉक या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आला आहे. त्याने भारताविरुद्ध एकदिवसीय सामन्यांमध्ये खेळलेल्या १६ डावांमध्ये ६ वेळा शतक केले आहे. एबी डिविलियर्स, रिकी पॉंटिंग आणि कुमार संगकारा या यादीत अनुक्रमे तिसऱ्या चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर आहेत.
भारताविरुद्ध सर्वाधिक एकदिवसीय शतके करणारे फलंदाज.
१. सनथ जयसूर्या (८५ डाव) – ७ शतके
२. क्विंटन डी कॉक (१६ डाव) – ६ शतके
३. एबी डिविलियर्स (३२ डाव) – ६ शतके
४. रिकी पॉंटिंग (५९ डाव) – ६ शतके
५. कुमार संगकारा (७१ डाव) – ६ शतके
याचसोबत डी कॉक रविवारी केलेल्या शतकानंतर एका संघाविरुद्ध सर्वात कमी एकदिवसीय डावांमध्ये सहा शतक पूर्ण करणारा फलंदाज ठरला आहेत. भारताविरुद्ध खेळलेल्या एकदिवसीय सामन्यात डी कॉकने हा विक्रम केला.
एका संघाविरुद्ध सर्वात कमी डावांमध्ये ६ शतक करणारे फलंदाज
१. क्विंटन डी कॉक – दक्षिण अफ्रिका विरुद्ध भारत (१६ डाव)
२. विरेंद्र सेहवाग – भारत विरुद्ध न्यूझीलंड (२३ डाव)
३. एरॉन फिंच – ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड (२३ डाव)
४. सईद अन्वर – पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका (२६ डाव)
एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासाता एका संघाविरुद्ध सर्वात कमी डावांमध्ये स्वतःच्या १००० धावा पूर्ण करणाऱ्यांमध्ये डी कॉक चौथ्या क्रमांकावर आला आहे. रविवारच्या सामन्यात त्याला भारताविरुद्ध एकदिवसीय क्रिकेटमध्ये १६ व्या वेळी फलंदाजी करण्याची संधी मिळाली. या सामन्यात त्याने भारताविरुद्ध १००० एकदिवसीय धावा पूर्ण केल्या.
एका संघाविरुद्ध सर्वात कमी डावांमध्ये १००० एकदिवसीय धावा करणारे फलंदाज
१. हाशिम आमला – दक्षिण अफ्रिका विरुद्ध वेस्ट इंडीज (१४ डाव)
२. विव्ह रिचर्ड्स – वेस्ट इंडीज विरुद्ध इंग्लंड (१५ डाव)
३. स्टीव स्मिथ – ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत (१६ डाव)
४. क्विंटन डी कॉक – दक्षिण अफ्रिका विरुद्ध भारत (१६ डाव)
दरम्यान, भारताविरुद्धच्या या तिसऱ्या आणि शेवटच्या एकदिवसीय सामन्यात डी कॉकने केलेल्या खेळीच्या जोरावर दक्षिण अफ्रिका संघ ४९.५ षटकात २८७ धावा करून सर्वबाद झाला. डी कॉक आणि रासी वॅन डर ड्यूसेन यांनी दक्षिण अफ्रिकेसाठी १४४ धावांची भागीदारी केली. ड्यूसेन ५२ धावांसह दक्षिण अफ्रिकेसाठी दुसरा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. भारतासाठी प्रसिद्ध कृष्णने सर्वाधिक तीन विकेट्स घेतल्या. तसेच जसप्रीत बुमराह आणि दीपक चहरने प्रत्येकी दोन आणि युजवेंद्र चहलने एक विकेट घेतली.
महत्वाच्या बातम्या –
कॅप्टन केएलचा ‘रॉकेट थ्रो’ आणि बवुमा तंबूत; पाहा व्हिडिओ
संधी मिळताच चहरने करून दाखवली अशी कामगिरी, जी तीन वर्ष करण्यास तरसलेले गोलंदाज
द्रविड प्रशिक्षक म्हणून पहिल्याच परदेशी दौऱ्यात ‘नापास’, तरीही पाकिस्तानी दिग्गजाने केली पाठराखण
व्हिडिओ पाहा –





