इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाला पराभवाला सामोरे जावे लागले आहे. कसोटी मालिकेतील तिसऱ्या सामन्यात इंग्लडने भारताला एक डाव आणि ७६ धावांच्या मोठ्या फरकाने पराभूत केले आहे. सामन्याच्या चौथ्या दिवशी भारतीय संघ २७८ धावांवर सर्वबाद झाला आणि त्याचक्षणी इंग्लंडने सामना जिंकला. भारतीय संघाला तिसऱ्या सामन्यात मिळालेल्या या पराभवानंतर मालिकेत दोन्ही संघ १-१ अशा बरोबरीवर आले आहेत. तत्पूर्वी भारताने दुसऱ्या सामन्यात १५१ धावांनी विजय मिळवला होता.
तिसऱ्या कसोटीत सामन्याच्या तिसऱ्या दिवशी भारतीय संघाने सामन्यात पकड बनवण्याचा प्रयत्न करत २ विकेट्स गमावत २१५ धावा केल्या होत्या. मात्र सामन्याच्या चौथ्या दिवशी पहिल्या सत्रात संघाने त्यांचे ८ विकेट्स फक्त ६३ धावांवर गमावले. त्यानंतर चौथ्या दिवशी भारतीय संघ सर्वबाद झाला आणि सामना गमावला. भारतीय संघाचे चेतेश्वर पुजारा, कर्णधार विराट कोहली, अजिंक्य रहाणे, रिषभ पंत हे खेळाडू त्यांच्या खराब फार्मशी झगडत आहेत. अशात तिसऱ्या सामन्यातील पराभवासाठी संघाचा कर्णधार विराट कोहलीने घेतलेल्या काही निर्णयांना जबाबदार धरले जात आहे.
भारताचा नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय
विराट कोहलीला इंग्लंडमध्ये ८ सामन्यानंतर नाणेफेक जिंकण्यामध्ये यश आले होते. त्याला याआधी ८ सामन्यात नाणेफेक जिंकता आली नव्हती. त्याने या सामन्यात नाणेफेक जिंकली आणि उत्साहात प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. लीड्स स्टेडियमवर या सामन्याआधी झालेल्या ५ सामन्यांमध्ये ज्या संघाने नाणेफेक जिंकली त्यांनी सामना गमावलेला आहे. विराटनेही तीच चूक केली आणि भारतीय संघाने सामना गमावलेला आपल्याला दिसत आहे.
भारतीय संघाचे लीड्सवर खराब प्रदर्शन
इंग्लंडने भारताला पहिल्या डावात खूपच स्वस्तात गुंडाळले. एवढ्या कमी धावसंख्येवर कोणत्याही संघाला सामन्यात पुनरागमन करणे कठीण असते. कमी धावसंख्येमुळे भारतीय संघ सामन्याच्या पहिल्याच दिवशी पराभवाच्या जवळ गेला होता. तसेच भारतीय वेगवान गोलंदाजांनी ज्याप्रकारे लाॅर्ड्सच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात कामगिरी केली होती, तशी त्यांना लीड्सवरच्या तिसऱ्या कसोटीत करता आली नाही. मोहम्मद शमी वगळता कोणत्याच भारतीय गोलंदाजाला तिसऱ्या सामन्यात चांगली कामगीरी करता आली नाही.
रविचंद्रन अश्विनला केले गेले दुर्लक्षित
भारताचा प्रतिभाशाली फिरकी गोलंदाज आर अश्विनला तिसऱ्या कसोटी सामन्यातही संधी दिली गेली नाही. तो भारताचा अव्वल क्रमांकाचा फिरकी गोलंदाज आहे. तो संध्या त्याच्या चांगल्या फार्ममध्येही आहे. असे असले तरीही त्याला संघात अंतिम ११ खेळाडूंमध्ये संधी मिळालेली नाही. त्याऐवजी भारतीय संघाने अष्टपैलू खेळाडू रविद्र जडेजाला संघात संधी दिली आहे. जडेजा भारतीय संघासाठी महागात पडत आहे. त्याने गोलंदाजी आणि फलंदाजी या दोन्हीतही काही चांगली कामगिरी केलेली नाही. त्याच्या खात्यात केवळ दोन विकेट्स आहेत.
जो रूट ठरतोय इंग्लंडची संरक्षक भीत
तिसऱ्या कसोटी पराभवासाठी इंग्लंडचा कर्णधार जो रूट हा देखील महत्वाचे कारण ठरला आहे. लीड्सवर ज्या खेळपट्टीवर भारतीय फलंदाज एकामागे एक विकेट्स देत गेले. त्याच खेळपट्टीवर त्याने भारतीय गोलंदाजांविरूद्ध १२१ धावांची खेळी केली. त्याने या कसोटी मालिकेत सलग तीन शतक करण्याचा पराक्रम केला आहे. असे दिसत आहे की, भारतीय गोलंदाजांकडे त्याच्याशी लढण्यासाठी योग्य रणनीती केलेली नाही.
महत्त्वाच्या बातम्या-
लाईव्ह सामन्यात पंतभाऊ वेगळ्याच धुंदीत, गोलंदाजाने रनअप घेतला; तरीही करत होता शॅडो बॅटिंग
भारताच्या ‘त्रिमूर्ती’लाही पुरुन उरला एकटा जो रूट, कामगिरी पाहून तुम्हीही कराल कौतुक