सध्या सर्वत्र आयपीएल २०२१ स्पर्धेची चर्चा सुरू आहे. अशातच औरंगाबादच्या सायकलपटू सोनम शर्मा यांनी मोठा कारनामा करत सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. त्यांनी एका वर्षाच्या कालावधीत एक वेळेस नव्हे तर तब्बल दोन सुपर रॅंडोनिअर्सचा पुरस्कार मिळवला आहे.
सायकल चालवण्याची प्रचंड आवड असणाऱ्या सोनम शर्मा यांनी निर्धारित वेळेत दोन वेळा लक्ष्य पूर्ण केले आणि हा पुरस्कार पटकावला. ही औरंगाबाद साठीच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी आनंदाची बातमी आहे.
फ्रान्स मधील ॲडॉक्स क्लब पॅरीसिअन ही संस्था जगभरातील सायकल टुरिझमला प्रोत्साहन देत असते, त्यांच्या द्वारे दरवर्षी ही स्पर्धा आयोजित केली जात असते. या स्पर्धेच्या मुख्य नियम म्हणजे निर्धारित वेळेत ठरलेले अंतर पूर्ण करणे. सुपर रॅंडोनिअर्स या स्पर्धेत २०० किमी,३०० किमी,४०० किमी आणि ६०० किमी अंतर पूर्ण करावे लागते. हे अंतर पूर्ण करण्यासाठी एक वर्षाचा कालावधी दिला जातो.
औरंगाबादच्या सोनम शर्मा यांनी ऑक्टोबर २०२० ते ऑक्टोबर २०२१ दरम्यान हे अंतर दोन वेळेस पूर्ण केले आणि दोन वेळेस असा कारनामा करणाऱ्या त्या मराठवाड्यातील पहिल्या महिला सायकलपटू ठरल्या आहेत.
या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी बीआरएमच्या ॲपवर नाव नोंदणी करावी लागते. रॅंडोनीअरिंगचा अर्थ असा की, कोणाचीही मदत न घेता, केलेले लांब पल्ल्याचे सायकलिंग. परंतु, ही स्पर्धा सुरू असताना इतरांना मदत करणे हा या स्पर्धेचा मुख्य उद्देश असतो. हा पुरस्कार पटकावल्यानंतर सोनम शर्मावर कौतुकाचा वर्षाव केला जात आहे. यानंतर औरंगाबाद जिल्हा सायकल संघटनेचे अध्यक्ष निखिल कचेश्वर यांनी देखील त्यांना शुभेच्छा दिल्या.
महत्त्वाच्या बातम्या –
Video: भारताने पैसे देणे बंद केले, तर उध्वस्त होईल पाकिस्तान क्रिकेट, पीसीबी अध्यक्षांचा खुलासा
आता गोलंदाजांनाही मिळू शकते फ्री हिट, ‘या’ स्पर्धेपासून क्रांतिकारक नियम होऊ शकतो लागू
बीसीसीआयची मोठी घोषणा! ‘या’ दिवशी टी२० विश्वचषकासाठी टीम इंडियाची नवी जर्सी होणार लॉन्च