---Advertisement---

विराट-सचिनची बॅट बनवणारा कारागीर अडचणीत; सोनू सूदने केला मदतीसाठी हात पुढे

---Advertisement---

मुंबई । काही दिवसांपूर्वी अशी बातमी आली होती की, सचिन तेंडुलकर, विराट कोहली, स्टीव्ह स्मिथ या दिग्गज फलंदाजांची बॅट तयार करणारा माणूस आज एका अत्यंत कठीण परिस्थितीत अडकला आहे. दिग्गज फलंदाजांना मदत करणारे मुंबईचे प्रसिद्ध बॅट कारागीर अशरफ चौधरी आज रुग्णालयात दाखल आहे आणि त्यांच्याकडे उपचारासाठी पैसेही नाहीत.

ही बातमी माध्यमांपर्यंत येत असतानाही कुठल्याही क्रिकेटपटूने मदतीसाठी पुढाकार घेतला नाही. पण कोरोना काळातील नायक म्हणून समोर आलेला सोनू सूद आता मदतीसाठी पुढे आला आहे.

सोनू सूद आपल्या ट्विटर हँडलवरून लोकांच्या ट्वीटला प्रतिसाद देऊन लोकांना मदत करत आहेत. सोनू कधी कुणाला घरी पोहचवत आहे तर कधी कुणाला ट्रॅक्टर घेऊन देत आहे. शनिवारी एकाने अशरफ यांची बातमी शेअर केली आणि लिहिले की ‘सोनू सूद तुम्हाला काही करता येईल का पहा. देव तुम्हाला आशीर्वाद देईल. सोनू सूदने थोड्या वेळात उत्तर दिले आणि म्हणाले, ‘भावाचा पत्ता शोधा’.

गरिबांना करतात अडचणीत मदत

आतापर्यंत सोनू सूदने अनेक गरीब आणि अडचणीत अडकलेल्या लोकांना मदत केली आहे. सोशल मीडियावर त्याला सुपरहिरो म्हटले जात आहे. कोरोनामुळे झालेल्या लॉकडाऊन दरम्यान सोनू सूद प्रवाशांना बसमध्ये बसवून त्यांच्या घरी घेऊन गेले होते. यानंतरही ते सतत चर्चेत आले होते.

किडनीच्या आजाराने त्रस्त

अशरफ भाई म्हणून ओळखले जाणारे कारागीर किडनीच्या समस्येने त्रस्त आहेत. गेल्या काही आठवड्यांपासून मुंबईतील रुग्णालयात उपचार घेत आहेत. अशरफचे हितचिंतक प्रशांत जेठमलानी त्यांची काळजी घेत आहेत आणि त्यांच्या उपचारासाठी पैसेही जमवत आहे.

क्रिकेटपटूंनी नाही दिले पैसे

अशरफ भाईचे मुंबईच्या मेट्रो सिनेमाजवळ दुकान आहे. अलीकडे अशरफ यांच्या भावाचे दुःखद निधन झाले आहे. अशरफ यांचे मित्र जेठमलानी यांनी खुलासा केला की, बर्‍याच क्रिकेटपटूंना अशरफचे पैसे द्यायचे आहेत. पण त्यांनी अद्याप पैसे दिले नाहीत. अशरफनेही आतापर्यंत खेळाडूंकडून पैसे मागितले नाहीत. जेठमलानी म्हणाले की, ‘आता अवघड प्रसंगी अशरफला क्रिकेटपटूंनी मदत करण्याची गरज आहे.’

 

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---