पुणे । १३ वी दक्षिण अशियायी क्रीडा स्पर्धा नेपाळ येथे होणार आहे़ त्यासाठी भारतीय वुशु टीमची निवड १० नोव्हेंबर रोजी मेरठमध्ये होणार आहे़ यासाठी निवड समितीच्या तांत्रिक समितीवर सोपान कटके यांची निवड झाली आहे़.
सोपान कटके हे महाराष्ट्र वुशु संघटेनेचे महासचिव आणि शिवछत्रपती पुरस्कार विजेते खेळाडू तसेच आंतरराष्ट्रीय पंच आहेत़ दिनांक १ ते १० डिसेंबर या कालावधीत ही स्पर्धा होणार आहे.
या निवडीबद्दल वुशू असोसिएशन आॅफ इंडियाचे अध्यक्ष भुपेंदरसिंग बाजवा, आॅल महाराष्ट्र वुशू असोसिएशनचे अध्यक्ष एस़ एस़ झेंडे, औरंगाबाद वुशु असोसिएशनचे अध्यक्ष अंबादास दानवे, सचिव महेश इंदापुरे, महाराष्ट्र आॅलिंम्पिक संघटनेचे महासचिव बाळासाहेब लांडगे, जिल्हा क्रीडा अधिकारी विजय संतान, रिवरडेल स्कूलच्या संचालिका साक्षी देशपांडे, औरंगाबाद आॅलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष पंकज भारसाखले, औरंगाबादचे जिल्हा क्रीडाधिकारी अशोक गिरी यांनी त्यांचे अभिनंदन केले़