वेलिंग्टन। अष्टपैलू सोफी डिवाईनची न्यूझीलंडच्या महिला क्रिकेट संघाच्या कर्णधारपदी निवड करण्यात आली आहे.
“सोफी डिवाईन (Sophie Devine) न्यूझीलंड महिला क्रिकेट संघाची कर्णधार असेल, तर ऍमी सॅटर्थवेटच्या (Amy Satterthwaite) प्रसूतीच्या रजेवरून परतल्यानंतर उपकर्णधार पदाची जबाबदारी स्विकारणार आहे,” असे न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने पत्रकार परिषदेत म्हटले.
डिवाईनला मागील मोसमात प्रभारी न्यूझीलंड महिला संघाचे कर्णधारपद सोपविण्यात आले होते. कर्णधार म्हणून तिने उत्कृष्ट कामगिरी केल्यामुळे तिला पूर्णवेळ कर्णधार बनविले आहे.
डिवाईन म्हणाली, “न्यूझीलंड महिला क्रिकेट संघाचे नेतृत्व करण्यास मिळणे खूप मोठा सन्मान आहे. मी मागील मोसमात कर्णधार म्हणून आपल्या भूमिकेचा आनंद लुटला होता. अनेकवेळा हे आव्हानात्मक राहिले. परंतु मला वाटते की आम्ही एक संघ म्हणून योग्य दिशेने वाटचाल करत आहोत.”
Wellington's @sophdevine77 has been confirmed as our captain with @AmySatterthwait to take the role of vice-captain following her return from maternity leave #CricketNation https://t.co/1cl89iifdh
— WHITE FERNS (@WHITE_FERNS) July 9, 2020
३० वर्षीय डिवाईनने न्यूझीलंड महिला संघाकडून आतापर्यंत १०५ वनडे आणि ९१ आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळले आहेत. त्यात तिने वनडेत ३१.७२ च्या सरासरीने २५७० धावा केल्या आहेत तसेच गोलंदाजी करताना ७१ विकेट्स घेतल्या आहेत. याव्यतिरिक्त टी२०त तिने ३१.३६ च्या सरासरीने २३८४ धावा केल्या आहेत तसेच गोलंदाजी करताना तिने ८७ विकेट्सही घेतल्या आहेत.
ट्रेंडिंग घडामोडी-
-“दूधातून माशी बाजूला काढावी तसे रहाणेला वनडे संघातून बाहेर काढले”
-असा देवमाणूस; ज्याने भारतीय संघाला शिकवले सामने जिंकण्याचे सायन्स
-बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री पडली जसप्रीत बुमराच्या प्रेमात?