---Advertisement---

‘पाकिस्तान विरुद्ध नाही, ट्रॉफी जिंकण्यासाठी खेळा’; टीम इंडियाला ‘दादा’ने दिला प्रेमाचा सल्ला

On: बुधवार, ऑगस्ट 17, 2022 2:47 PM
Rohit-Sharma-Sourav-Ganguly
---Advertisement---

झिम्बाब्वेमधील एकदिवसीय मालिकेनंतर, भारतीय संघ आशिया कप २०२२साठी यूएईला जाणार आहे. चार वर्षांनंतर आशियाई वर्चस्वाची लढाई होणार आहे. आशिया चषक २७ ऑगस्टपासून सुरू होणार आहे, परंतु रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ २८ ऑगस्ट रोजी दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर स्पर्धेतील त्यांच्या पहिल्या सामन्यात कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी सामना करेल.

बीसीसीआय अध्यक्ष आणि भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने आशिया चषक २०२२ मधील भारत विरुद्ध पाकिस्तान ब्लॉकबस्टर सामन्यापूर्वी खेळाडूंना एक महत्वाचे विधान केलं आहे. गांगुलीने म्हटले आहे की, “त्यांच्यासाठी आशिया चषक ही भारत आणि पाकिस्तानमधील लढत नाही तर ट्रॉफी जिंकणे आहे. गेल्या वर्षी झालेल्या टी-२० विश्वचषकात भारत आणि पाकिस्तान आमनेसामने आले होते, ज्यात भारताचा १० गडी राखून पराभव झाला होता.”

आशिया चषकावर इंडिया टुडेशी बोलताना सौरव गांगुली म्हणाला की, “मी याकडे आशिया चषक म्हणून पाहत आहे. मला भारत विरुद्ध पाकिस्तान अशी कोणतीही स्पर्धा दिसत नाही. जेव्हा मी माझ्या खेळाच्या दिवसात असायचो, तेव्हा भारत विरुद्ध पाकिस्तान असा सामना व्हायचा. माझ्यासाठी फक्त एकच सामना असेल. मला नेहमीच स्पर्धा जिंकायची होती. भारत हा एक चांगला संघ आहे आणि त्यांनी अलीकडच्या काळात खूप चांगली कामगिरी केली आहे आणि आशा आहे की ती टीम आशिया कपमध्येही चांगली कामगिरी करेल.”

भारताने सात वेळा आशिया कप जिंकला आहे. आतापर्यंत खेळल्या गेलेल्या १४ आवृत्त्यांपैकी, भारताने १३ हंगामात भाग घेतला आहे आणि सात वेळा चॅम्पियन होण्याचा मान मिळवला आहे. त्याचबरोबर आशिया चषकाच्या इतिहासात १४ वेळा भारतीय संघाने पाकिस्तानशी सामना केला आहे, ज्यामध्ये ८ सामने जिंकले आहेत आणि ५ सामने हरले आहेत. एक सामना अनिर्णित राहिला. त्याचवेळी, २०१० पासून आशिया चषक स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यात सहा सामने झाले आहेत, ज्यामध्ये भारताने पाच सामने जिंकले आहेत.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

महत्वाच्या बातम्या-

lpl: चेन्नईच्या स्टार गोलंदाजाने घेतलाय भन्नाट कॅच, व्हिडिओ पाहून तुम्हीही व्हाल दंग

पाकिस्तानची स्पीडगन पडली भारी! फलंदाजाच्या उडवल्या दांड्या, भन्नाट व्हिडिओ होतोयं व्हायरल

कॅप्टन्सी गमावल्यानंतर प्रथमच बोलला शिखर; म्हणाला, “राहुल हा…”

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---