---Advertisement---

कमालच नाही का! ‘दादा’ अन् त्याचा रेकॉर्ड ब्रेकर डेव्हन कॉनवेमध्ये आहेत ‘या’ ६ गोष्टी समान

---Advertisement---

इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड संघात बुधवारपासून (२ जून) २ सामन्यांच्या कसोटी मालिकेला सुरुवात झाली आहे. लॉर्ड्स क्रिकेट ग्राऊंडवर सुरु झालेला पहिल्या कसोटी सामना न्यूझीलंडचा फलंदाज डेवॉन कॉनवेने शतकी खेळी करत गाजवला आहे. त्या या सामन्यात द्विशतकी खेळी करत अनेक विक्रमांना गवसणी घातली. त्याच्या कामगिरीची चर्चा सध्या क्रिकेट जगतात सर्वत्र सुरु आहे. विशेष म्हणजे या सामन्यातून त्याने कसोटी पदार्पण केले आहे.

पदार्पणात मोडला गांगुलीचा विक्रम
या सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे या सामन्यातून कसोटी पदार्पण केलेला डेवॉन कॉनवे टॉम लॅथमसह फलंदाजीला उतरला. कारकिर्दीतील पहिलाच सामना कॉनवे क्रिकेटची पंढरी समजले जाणाऱ्या लॉर्ड्सवर खेळत आहे.

त्याने पहिल्याच डावात २०० धावांची खेळी केली. ही खेळी त्याने ३४७ चेंडूत २२ चौकार आणि १ षटकारासह केली. त्यामुळे त्याने लॉर्ड्सवर पदार्पणाच्या कसोटी सामन्यात सर्वोच्च वैयक्तिक धावांची खेळी करण्याचा सौरव गांगुलीचा विक्रम मोडला आहे. गांगुलीनेही १९९६ साली त्याचे कसोटी पदार्पण लॉर्ड्सवर केले होते. तसेच त्याने पदार्पणाच्या सामन्यात १३१ धावांची खेळी केली होती.

गांगुली आणि कॉनवेमध्ये काही समानता
कॉनवेने गांगुलीचा विक्रम मोडल्याने त्या दोघांमधील समानतेबद्दल चर्चा सुरु आहे. विशेष म्हणजे त्यांच्या ६ समानता आढळेले आहेत. या समानतेबद्दल जाणून घेऊ.

कॉनवे आणि गांगुली या दोघांचाही वाढदिवस ८ जुलैला असतो. कॉनवेचा जन्म ८ जुलै १९९१ रोजी झाला आहे. तर गांगुलीचा ८ जुलै १९७२ रोजी झाला आहे. म्हणजेच या दोघांमध्ये तब्बल १९ वर्षांचे अंतर आहे. तसेच दोघेही डावखुरे फलंदाज आहेत. तिसरी समानता म्हणजे गांगुली आणि कॉनवे या दोघांनाही पहिला आंतरराष्ट्रीय सामना वेस्ट इंडीज विरुद्ध खेळला होता. चौथी समानता म्हणजे गांगुली आणि कॉनवेने यांनी आपला पहिला कसोटी इंग्लंड विरुद्ध जून महिन्यातच खेळला. तसेच दोघांनीही आपल्या कसोटी पदार्पणाच्या सामन्यात लॉर्ड्सवरच शतकी खेळी केली. त्याचबरोबर दोघेही आंतरराष्ट्रीय पदार्पणाच्या कॅप नंबर ८४ आहे

कॉनवेबद्दल थोडेसे…
डेवोन कॉनवे मुळचा दक्षिण आफ्रिकन असून क्रिकेट कारकिर्दीसाठी त्याने न्यूझीलंड देश गाठला. क्रिकेटसाठी कॉनवेने स्वतःची गाडी, प्रोपर्टी विकून क्रिकेट खेळन्यासाठी पैसा उभारला आणि आज त्याचा कष्टाचे चीज झालं असे म्हणता येईल. कसोटी पदार्पणात २०० धावा केलेला कॉनवे हा न्यूझीलंड संघाकडून दुसरा खेळाडू तर विश्वातील ७वा खेळाडू ठरला. तसेच, लॉर्ड्स मैदानावर पदार्पणात २०० धावा करणारा पहिला खेळाडू ठरला.

महत्त्वाच्या बातम्या – 

फलंदाजांची फिरकी घेणारा भज्जी बनला ‘कूक’, त्याने बनवलेला पदार्थ बघून तोंडात येईल पाणी

भारतीय खेळाडूंसमोर असेल ‘हे’ आव्हान; इंग्लंडमध्ये असलेल्या विहारीचे वक्तव्य

 विराटपेक्षा रोहित आहे यशस्वी कर्णधार, ‘ही’ आहेत त्यामागची ५ समर्पक कारणे

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---