---Advertisement---

शास्त्री गुरूजींच्या भविष्याचा निर्णय घेण्यासाठी बीसीसीआय अधिकारी पोहोचले लंडनला

On: गुरूवार, ऑगस्ट 12, 2021 3:30 PM
ravi-shashtri
---Advertisement---

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) राष्ट्रीय क्रिकेट अकादमीच्या (एनसीए) संचालक पदासाठी अर्ज मागवण्यास सुरुवात केली. त्यामुळे, विद्यमान संचालक राहुल द्रविड याने हे पद सोडल्यानंतर, त्याच्याकडे वरिष्ठ संघाची जबाबदारी दिली जाऊ शकते, अशी चर्चा सुरू झाली आहे. दुसरीकडे, भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी टी२० विश्वचषकानंतर आपण मुख्य प्रशिक्षक पद सोडणार असल्याचे, काही बीसीसीआय अधिकाऱ्यांना म्हटल्याचे सांगितले जातेय. याच विषयाबाबत चर्चा करण्यासाठी बीसीसीआयचे वरिष्ठ अधिकारी लंडन येथे पोहोचले आहेत.

हे पदाधिकारी पोहचले लंडनला
रवी शास्त्री भविष्यात भारतीय संघाचे प्रशिक्षक पद भूषवणार की नाही याबाबत चर्चा करण्यासाठी बीसीसीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे शिष्टमंडळ गुरुवारी (१२ ऑगस्ट) लंडन येथे पोहोचले आहे. याच दिवशी इंग्लंड आणि भारत यांच्यातील दुसरा कसोटी सामना ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानावर खेळला जाईल. या शिष्टमंडळात बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली, सचिव जय शहा, उपाध्यक्ष राजीव शुक्ला व कोषाध्यक्ष अरुण धूमल यांचा समावेश आहे.

याबाबत बोलणे घाईचे ठरेल
बीसीसीआय पदाधिकाऱ्यांच्या लंडन भेटीबाबत बोलताना एका अधिकार्‍याने नाव न सांगण्याच्या अटीवर म्हटले,
“तुम्हाला माहिती आहे की बीसीसीआयचे अध्यक्ष, सचिव, कोषाध्यक्ष आणि उपाध्यक्ष आज लंडनमध्ये राहणार आहेत. त्यामुळे ते शास्त्री आणि संघाशी संवाद साधतील. यामध्ये आगामी दौरा आणि भारतीय क्रिकेटच्या भविष्याविषयी विविध गोष्टींवर चर्चा होईल. शास्त्री यांना प्रशिक्षक म्हणून टी२० विश्वचषकानंतर काम करायचे नसेल तर, त्यावर नक्कीच चर्चा होईल. मात्र, तरीही मी म्हणेन की याबद्दल बोलणे फार घाईचे ठरेल.”
रवी शास्त्री हे २०१७ चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक बनले होते.

द्रविड आहे प्रमुख दावेदार
रवी शास्त्री यांनी भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षक पदाचा राजीनामा दिल्यानंतर हे पद भारताचा माजी कर्णधार राहुल द्रविड याच्याकडे जाऊ शकते. नुकत्याच संपलेल्या श्रीलंका दौऱ्यावर त्याने उत्कृष्टरित्या संघाचे संचालन केले होते. मात्र, त्याने त्याने आपण सध्या करत असलेले काम आनंद देत असल्याचे म्हटले आहे. द्रविड सध्या एनसीएचा संचालक असून, तो भारताच्या युवा संघाने मार्गदर्शन करत असतो.

महत्त्वाच्या बातम्या-

https://mahasports.in/bcci-invites-applications-for-nca-director-post-dravid-likely-to-reapply/amp/

लॉर्ड्सवर संपणार विराटच्या शतकांचा दुष्काळ? ‘हे’ आहे कारण

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---