---Advertisement---

‘IPL ट्रॉफी जिंकणे विश्वचषक जिंकण्यापेक्षा महाकठीण…’, गांगुलीच्या विधानाने देशभरात माजू शकते खळबळ

On: मंगळवार, जून 13, 2023 10:46 AM
Sourav-Ganguly
---Advertisement---

भारतीय संघ लंडनच्या के ओव्हल मैदानावर जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा 2023चा अंतिम सामना वाईट पद्धतीने पराभूत झाला. ऑस्ट्रेलियाने भारताला 209 धावांनी पराभवाचा धक्का दिला. भारत पराभूत होऊन आता दोन दिवस झाले आहेत, पण पराभवाची चर्चा मात्र थांबायचं नाव घेत नाहीये. अनेक क्रिकेट जाणकार आणि चाहते भारताच्या पराभवासाठी आयपीएल स्पर्धेला जबाबदार ठरवत आहेत. अशातच बीसीसीआयचा माजी अध्यक्ष आणि माजी कर्णधार सौरव गांगुली याने खळबळजनक विधान केले आहे. त्याच्या या विधानाने खळबळ माजण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

‘आयपीएल ट्रॉफी जिंकणे विश्वचषक जिंकण्यापेक्षा कठीण’
भारतीय क्रिकेटमधील सर्वात यशस्वी कर्णधारांमध्ये गणल्या जाणाऱ्या सौरव गांगुली (Sourav Ganguly) याने माध्यमांशी संवाद साधला. तो म्हणाला की, “आयपीएल जिंकणे विश्वचषक जिंकण्यापेक्षा जास्त कठीण आहे. आयपीएलमध्ये तुम्हाला 14 सामने खेळायचे असतात. त्यानंतर प्लेऑफ आणि अंतिम सामना. तसेच, विश्वचषकात 4-5 सामन्यांनंतर अंतिम सामना असतो.”

तो पुढे बोलताना असेही म्हणाला की, “आयपीएल जिंकणे हे खूपच कठीण आहे. कारण, तिथे प्ले-ऑफमध्ये पोहोचण्यासाठी 14 साखळी सामने असतात. विश्वचषकात, तुम्ही 4-5 सामन्यांनंतर उपांत्य सामन्यात प्रवेश करता. आयपीएलमध्ये तुम्ही 16-17 सामने खेळल्यानंतर चॅम्पियन बनता.” मार्च महिन्याच्या शेवटी आयपीएल 2023चा अंतिम सामना पार पडला. या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने 2022च्या विजेत्या गुजरात टायटन्सला पराभूत करत पाचवी ट्रॉफी आपल्या नावावर केली.

डब्ल्यूटीसीचा अंतिम सामना
डब्ल्यूटीसी अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक गमावली, पण किताब मात्र जिंकला. त्यांनी पहिल्या डावात 469 धावांचा डोंगर उभारला होता. त्यानंतर भारतीय संघ पहिल्या डावात फक्त 296 धावांवर गारद झाला. यामुळे ऑस्ट्रेलिया संघाला 173 धावांची आघाडी मिळाली होती. यानंतर ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात 8 बाद 270 धावांवर डाव घोषित केला. यावेळी भारताला विजयासाठी 444 धावांचे आव्हान मिळाले. या आव्हानाचा पाठलाग करताना भारताने सर्वबाद 234 धावाच केल्या. त्यामुळे ऑस्ट्रेलियाने 209 धावांनी सामना जिंकत पहिले आयसीसी डब्ल्यूटीसी जेतेपद पटकावले. (sourav ganguly big statement said winning ipl trophy is more difficult than winning the world cup)

महत्वाच्या बातम्या-
IPLमध्ये स्टम्प तोडणाऱ्या अर्शदीपचा इंग्लंडमध्ये जलवा, घेतली काऊंटी क्रिकेटमधील पहिली विकेट- व्हिडिओ
सुट्टीच नाही! WTC गमावताच गांगुलीने भारतीय खेळाडूंना झाप झाप झापलं, म्हणाला, ‘धोनी-गंभीरसारखं 90-100…’

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---