---Advertisement---

‘अशी होती दादासोबत ५ वर्षांची राईड’ म्हणत विरूच्या बड्डे बॉय गांगुलीला लक्षवेधी अंदाजात शुभेच्छा

On: गुरूवार, जुलै 8, 2021 3:31 PM
---Advertisement---

भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांचा आज ४९ वा वाढदिवस आहे. या आनंदाच्या क्षणी त्यांना अनेक क्रिकेट चाहत्यांनी आणि दिग्गज क्रिकेटपटूंनी शुभेच्छा दिल्या आहेत. सौरव गांगुलीच्या नेतृत्वाखाली खेळलेल्या अनेक दिग्गज खेळाडूंनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. अशातच वीरेंद्र सेहवागने देखील आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक फोटो शेअर करत सौरव गांगुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

भारतीय संघाचा विस्फोटक फलंदाज वीरेंद्र सेहवाग हा सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असतो. तो नेहमीच आपल्या मजेशीर ट्विटमुळे चर्चेत असतो. त्याने सौरव गांगुली यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी सुद्धा मजेशीर फोटो शेअर केला आहे. त्याने प्रसिद्ध दाक्षिणात्य दिग्दर्शक एस एस राजामौली यांचा आगामी चित्रपट ‘आर आर आर’चा पोस्टर शेअर केला आहे, ज्यामध्ये ज्युनियर एनटीआर आणि राम चरण यांचा चेहरा हटवून सौरव गांगुली आणि वीरेंद्र सेहवागचा चेहरा लावण्यात आला आहे.

या फोटोतील बाईकच्या पुढे ‘दादा’ असे लिहण्यात आले आहे. या फोटोवर कॅप्शन देत त्याने लिहिले की, “दादांच्या गाडीवर स्वार होऊन, दादांसोबतच राईडवर जायचे. अशीच होती, सौरव गांगुलीसोबत माझी ५ वर्षांची राईड. माझी अशी प्रार्थना आहे की, तुमचे आरोग्य चांगले राहो, आनंदी आयुष्यासाठी शुभेच्छा..”(Sourav Ganguly birthday, virender sehwag shared rrr movie poster to wish sourav ganguly)

https://www.instagram.com/p/CRDaMmsF6lv/?utm_source=ig_web_button_share_sheet

https://www.instagram.com/p/CQsUoINMws7/?utm_source=ig_web_button_share_sheet

‘आर आर आर’ हा चित्रपट प्रदर्शित होण्याची अनेक चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटाच्या निर्मात्यांनी सांगितले की, हा चित्रपट लवकरच तयार होऊन प्रदर्शित केला जाणार आहे. हा चित्रपट येत्या १३ ऑक्टोबर रोजी रिलीज करण्यात येणार आहे. या चित्रपटात मुख्य भूमिका बजावणारे अभिनेते ज्युनियर एनटीआर आणि राम चरण या दोघांनी तेलुगू आणि तमिळ या दोन्ही भाषेत डबिंग पूर्ण केली आहे. तसेच चित्रपटातील २ गाणे अजूनही शूट व्हायचे आहेत.

महत्वाच्या बातम्या-

वाढदिवस विशेष: कर्णधारांचा कर्णधार- दादा..

भारताविरुद्धच्या टी२० मालिकेपुर्वी श्रीलंका संघ बदलणार संघनायक! ‘हा’ अष्टपैलू प्रबळ दावेदार

भारतीय क्रिकेटचा दादा…

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---