भारतीय क्रिकेट नियमक मंडळाचा (बीसीसीआय) भारताचा माजी महान कर्णधार सौरव गांगुली अध्यक्ष बनण्याची शक्यता आहे.
सर्वोच्च न्यायालयाने लोढा समितीच्या काही शिफारसींना वेगळे करण्याची आणि नवीन बदलांसह नवीन संविधानला मंजूरी दिल्याने गांगुलीला बीसीसीआयचा अध्यक्ष बनण्यासाठी मार्ग मोकळा झाला आहे.
गांगुली सध्या बंगाल क्रिकेट असोशिएशनचा अध्यक्ष आहे. तसेच हा त्याचा बंगालचा अध्यक्ष असतानाची तिसरा कार्यकाळ आहे. जर त्याने हे पद सोडले तर तो बीसीसीआयच्या अध्यक्षपद 2 वर्ष भूषवू शकतो.
त्याला बीसीसीआयचे अध्यक्षपद 2 वर्षांनी सोडावे लागेल कारण तो 6 वर्षांचा अध्यक्षपदाचा कार्यकाळ पूर्ण करेल.
मागील काही दिवसांपासून बीसीसीआयच्या प्रशासनात बरेच वाद सुरु आहेत. त्यामुळे बीसीसीआयला अशा प्रशासकाची गरज आहे, जो हा सगळा कारभार उत्तमरितीने संभाळू शकेल.
तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या अपेक्षांनाही पूर्ण करुन सर्व व्यवस्थापन सांभाळू शकेल. यामुळे गांगुलीचे नाव सध्या बीसीसीआयच्या अध्यक्षपदासाठी चर्चेत आहे.
याबरोबरच गांगुलीला बीसीसीआयच्या तांत्रिक समिती आणि क्रिकेट सल्लागार समिती बरोबर काम करण्याचाही अनुभव आहे.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या:
–अँडरसनचा तो चेंडू खेळायचा कसा? हरभजनचा सचिन तेंडुलकरला प्रश्न
–जेव्हा अर्जुन तेंडुलकर बनतो विक्रेता
–लॉर्ड्स कसोटीः भारतीय गोलंदाजांची कमाल, इंग्लंडच्या आघाडीच्या फळीला खिंडार