---Advertisement---

‘माणसांकडूनच चूका होतात’, गांगुलीकडून विराट-रोहितची पाठराखण

On: बुधवार, मे 25, 2022 5:31 PM
Rohit-Sharma-Virat-Kohli
---Advertisement---

इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) २०२२चा हंगाम शेवटच्या टप्प्यात आला आहे. यामध्ये अनेक खेळाडूंनी कौतुकास्पद तर काहींनी खराब कामगिरी केली आहे. त्यातच धडाकेबाज फलंदाज रोहित शर्मा आणि विराट कोहली यांची कामगिरी फारच निराशाजनक झाली. यामुळे त्यांचे चाहते फारसे खूश नसून त्यांच्यावर टीकाही होत आहे.

भारतीय क्रिकेट बोर्डचे (बीसीसीआय) अध्यक्ष सौरव गांगुली यांनी रोहित आणि विराटच्या आयपीएलमधील खराब कामगिरीचा बचाव केला आहे.

कोलकाताच्या एका कार्यक्रमामध्ये बोलताना गांगुली बोलत होते. “रोहितने मुंबईचे नेतृत्व करताना संघाला पाच वेळा आयपीएलचे विजेतेपद, आशिया कप जिंकून दिले आहेत. म्हणजे त्याने उत्तमरित्या कर्णधाराची जबाबदारी साभांळली आहे. विराटनेही संघाला गरज होती, तेव्हा चांगली खेळी केली आहे. मात्र ही माणसे आहेत आणि माणसांकडून चूका ह्या होतातच”, अशा शब्दांत सौरवने रोहित-विराटची पाठराखण केली आहे.

साल २०११ पासून मुंबईकडून खेळणाऱ्या रोहितनेही आतापर्यंतच्या आयपीएल हंगामातील त्याची सर्वात कमी सरासरी नोंदवली आहे. त्याने १४ सामन्यांत १९.१४ च्या सरासरीने २६८ धावा केल्या आहेत, तर पहिल्यांदाच त्याला अर्धशतकही करता आले नाही.

विराटनेही मागील सामन्यात (१९ मे, गुजरात टायटन्स विरुद्ध) या आयपीएलमधील त्याची सर्वोच्च अशा ७३ धावा केल्या. त्याआधी तो देखील फॉर्ममध्ये नव्हता. त्याने १३ सामन्यात २३६ धावा केल्या होत्या. तर तीन सामन्यांमध्ये तो शून्यावर बाद झाला होता. सध्याचा हंगाम तसेच सुरूवातीच्या सतत दोन हंगामामध्ये धावा करण्यात तो अयशस्वी झाला होता. त्याची २००८ आणि २००९ मध्ये सरासरी अनुक्रमे १५ आणि २२.३६ एवढी होती.

“रोहित-विराट हे एक उत्तम खेळाडू आहेत. त्यांचा सध्याचा फॉर्म जरी खराब असला, तरी ते लवकरच आपल्या फॉर्ममध्ये परत येतील आणि धावा करतील”, असेही गांगुली पुढे म्हणाले.

दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार रिषभ पंतवरही डीआरएसवरून प्रचंड टीका झाल्या होत्या. या कार्यक्रमामध्ये गांगुली यांनी, “पंतची तुलना एमएस धोनीशी करणे अत्यंत चूकीचे आहे. कारण धोनीकडे अनुभवाची कमी नाही. त्याने आयपीएल आणि आतंरराष्ट्रीय स्तरावर ५०० पेक्षा अधिक सामन्यांमध्ये संघांचे नेतृत्व केले आहे. त्याच्याकडे जबरदस्त यष्टीरक्षणाचा अनुभव देखील आहे,” असे म्हणत त्याचा बचाव केला आहे.

महा स्पोर्ट्चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

महत्वाच्या बातम्या-

‘स्वत:ला विराट कोहली समजतोय!’, पहिल्या क्वालिफायरमध्ये आगपाखड करणाऱ्या रियान परागला नेटकऱ्यांनी झापलं

गुजरातचा विजय किती खास? चेन्नईनंतर अशी संधी फक्त आता गुजरातच्या वाट्याला आलीये

‘फ्लाइंग कौर’! हवेत झेपावत हरमनप्रीतने घेतला अप्रतिम झेल; Video भन्नाट व्हायरल

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---