भारतीय संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीची(Sourav Ganguly) बंगाल क्रिकेट असोसिएशनच्या(कॅब) अध्यक्षपदी निवड झाली आहे.
याबद्दल बंगाल क्रिकेट असोसिएशनचे (Cricket Association of Bengal) निवडणूक अधिकारी सुशांत रंजन उपाध्याय यांनी माहिती दिली. त्यांनी सांगितले की गांगुलीची अध्यक्षपदासाठी बिनविरोध निवड झाली आहे. त्याच्याबरोबरच चार अन्य अधिकाऱ्यांचीही बिनविरोध निवड झाली आहे.
गांगुलीची कॅबच्या अध्यक्षपदी(President) दुसऱ्यांदा निवड झाली आहे. तो याआधी 2015मध्ये जगमोहन दालमियांच्या निधनानंतर कॅबचा अध्यक्ष झाला होता.
गांगुली या पदावर जूलै 2020 पर्यंत असणार आहे. त्यानंतर त्याचा बीसीसीआयच्या संविधानानुसार ‘कुलिंग ऑफ पिरियड’ सुरु होईल.
बीसीसीआयसाठी सर्वोच्च न्यायालयाने नेमलेल्या प्रशासन समीतीच्या आदेशानुसार कॅब शनिवारी 85 वी वार्षिक सर्वसाधारण बैठक आयोजित करतील. या बैठकीनंतर गांगुली पुन्हा एकदा अध्यक्षपदाची जबाबदारी हाती घेईल.
गांगुली 2020 मध्ये कॅबमधील पदाधिकारी म्हणून 6 वर्षे पूर्ण करेल. त्यामुळे त्याला कूलिंग ऑफ पिरियड अनिवार्य असेल.
त्याचबरोबर दालमियांचा मुलगा अविशेक सचिव म्हणून काम पाहिल. याआधी ते संयुक्त सचिव होते. त्यांच्या जागेवर आता देबब्रत दास यांची निवड झाली आहे. तसेच देबाशिष गांगुली कोषाध्यक्ष असतील.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –
–जेव्हा पुण्याचा २२ वर्षीय ऋतुराज गायकवाड एमएस धोनीला करतो इंप्रेस…
–हे आहे टीम इंडियाने विश्वचषक न जिंकण्याचे कारण, युवराज सिंगचा मोठा खूलासा
–रोहित शर्माने कसोटीत ओपनिंग करण्याबद्दल अजिंक्य रहाणे म्हणाला…