---Advertisement---

माजी क्रिकेटरचा गंभीर आरोप; कष्ट गांगुुलीने केले तर धोनीला सगळं फुकटात मिळालं

On: मंगळवार, जुलै 14, 2020 3:36 PM
---Advertisement---

भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि सध्याचा बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीने भारतीय क्रिकेट मजबूत करण्यासाठी पाया रचला असल्याचे, भारतीय संघाचे माजी कर्णधार कृष्णमचारी श्रीकांत यांनी म्हटले आहे. त्यांनी पुढे म्हटले की विजय मिळवण्यासाठी सज्ज असलेल्या खेळाडूंचा संघ गांगुलीने धोनीच्या ताटात वाढून दिला. गांगुलीने भारतीय संघाची मानसिकता आणि खेळण्याची वृत्ती बदलली.

स्टार स्पोर्ट्सचा ‘क्रिकेट कनेक्टेड’ या कार्यक्रमात श्रीकांत यांच्याव्यतिरिक्त माजी क्रिकेटपटू कुमार संगकारा, ग्रॅमी स्मिथ, गौतम गंभीर यांचाही समावेश होता. हे सर्व खेळाडू भारतीय क्रिकेटमध्ये झालेले बदल तसेच सौरव गांगुली (Sourav Ganguly) आणि एमएस धोनी (MS Dhoni) यांनी सोडलेल्या वारश्याविषयी चर्चा करत होते. श्रीकांत यांनी म्हटले, की गांगुली हा भारतीय क्रिकेटचा दृष्टीकोन बदलणारा कर्णधार होता.

ते म्हणाले, “गांगुलीने कठीण काळात भारतीय संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी सांभाळली. त्याने भारतीय क्रिकेटमध्ये बदल घडवण्यास सुरुवात केली. त्याने भारतीय संघाची मानसिकता बदलून टाकली.”

“धोनीने विराट कोहलीला (Virat Kohli) अधिक गुणवत्तापूर्ण खेळाडू दिले नाहीत. स्वत: विराट, रोहित शर्मा (Rohit Sharma) किंवा जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) हे खेळाडू सोडले, तर संघात असे खेळाडू नाहीत जे तुम्हाला स्पर्धा जिंकूण देतील,” असे माजी खेळाडू गौतम गंभीर म्हणाला.

गंभीर म्हणाला, गांगुलीने भारतीय संघासाठी अनेक खेळाडू तयार केले आहेत. गांगुलीबद्दल बोलताना तो म्हणाला, “गांगुलीने युवराज सिंग, हरभजन सिंग, झहीर खान, विरेंद्र सेहवाग यांसारखे खेळाडू भारतीय संघाला दिले आहेत.”

ट्रेंडिंग घडामोडी-

-गांगुलीपेक्षा धोनी कधीही भारी, पहा कोणत्या माजी खेळाडूने केले हे भाष्य

-या व्यक्तीने भारतीय क्रिकेटची प्रतिमा जगात मलिन केली, आता…

-क्रिकेटमधील ५ असे अंपायर, जे कायमच चाहत्यांचे राहिले खास

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---