जेएसडब्ल्यू स्पोर्ट्सने सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक असलेल्या सौरव गांगुलीची (Sourav Ganguly) नवीन क्रिकेट संचालक म्हणून नियुक्ती केली आहे. गांगुली 2019 मध्ये जेएसडब्ल्यू आयपीएल संघ ‘दिल्ली कॅपिटल्स’मध्ये (IPL Capitals) सल्लागार म्हणून सामील झाला आणि दिल्लीचा मुख्य प्रशिक्षक रिकी पाॅन्टिंगसोबत काम केले, नंतर आता दिल्ली कॅपिटल्सने गांगुलीची क्रिकेट संचालकपदी नियुक्ती केली आहे.
आपल्या नवीन भूमिकेबद्दल बोलताना म्हणाला, “मी जेएसडबल्यू समूह आणि जिंदाल कुटुंबाला वैयक्तिक आणि व्यावसायिकरित्या ओळखतो, ज्यामुळे हा निर्णय सोपा झाला. त्यांच्या क्रिकेटशी संबंधित प्रकल्पासाठी मी माझा अनुभव देऊ शकलो याचा मला आनंद आहे.”
जेएसडब्ल्यू (JSW) स्पोर्ट्सचे संस्थापक पार्थ जिंदाल म्हणाले, “दादांना क्रिकेटची दुर्मिळ समज आहे आणि आता एक संचालक म्हणून, ते जेएसडब्ल्यू स्पोर्ट्समध्ये क्रिकेटशी संबंधित सर्व गोष्टींचे नेतृत्व करणार आहेत.”
महत्त्वाच्या बातम्या-
कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा स्टंपिंग करणारे टाॅप-5 खेळाडू
भारताविरुद्ध 5 विकेट घेऊन इतिहास रचला, न्यूझीलंडच्या गोलंदाजाची अभिमानास्पद कामगिरी
भारत 46 धावांवर ऑल आऊट! रोहित ब्रिगेडच्या नावे अनेक लज्जास्पद विक्रमांची नोंद