---Advertisement---

सौरव गांगुलीला आयसीसीकडून मोठी जबाबदारी; ‘या’ समितीचं अध्यक्षपद सांभाळणार

Sourav Ganguli
---Advertisement---

माजी भारतीय क्रिकेटपटू आणि बीसीसीआयचे माजी अध्यक्ष सौरव गांगुलीला आयसीसीने मोठी जबाबदारी सोपवली आहे. त्यांना पुन्हा एकदा आयसीसी पुरुष क्रिकेट समितीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. 2021 मध्ये गांगुलीला पहिल्यांदाच अध्यक्षपद देण्यात आले होते, त्यावेळी त्यांनी अनिल कुंबळेची जागा घेतली होती. त्याआधी कुंबळेने त्याचे तीन कार्यकाळ पूर्ण केले होते. गांगुली व्यतिरिक्त व्हीव्हीएस लक्ष्मणलाही या समितीचा भाग बनवण्यात आले आहे.

सौरव गांगुलीसह आयसीसीच्या पुरुष क्रिकेट समितीचा भाग बनलेल्या सदस्यांमध्ये व्हीव्हीएस लक्ष्मण, अफगाणिस्तानचा माजी क्रिकेटपटू हमीद हसन, वेस्ट इंडिजचा अनुभवी खेळाडू डेसमंड हेन्स, दक्षिण आफ्रिकेचा कसोटी आणि एकदिवसीय संघाचा कर्णधार टेम्बा बावुमा आणि इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू जोनाथन ट्रॉट यांचा समावेश आहे.

दुसरीकडे, आयसीसी महिला क्रिकेट समितीबद्दल बोलायचे झाले तर, न्यूझीलंडची माजी ऑफ-स्पिन गोलंदाज कॅथरीन कॅम्पबेल यांची अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तिच्याशिवाय माजी ऑस्ट्रेलियन खेळाडू एव्हरिल फाही आणि फ्लोत्सी मोसेकी यांनाही महिला समितीत स्थान देण्यात आले आहे.

आयसीसीने अलिकडेच बीसीसीआय, ईसीबी आणि ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाच्या सहकार्याने एक नवीन उपक्रम सुरू केला आहे. अफगाणिस्तानात तालिबान सरकार सत्तेवर आल्यानंतर महिलांवर अनेक निर्बंध लादण्यात आले. अशा परिस्थितीत महिलांना क्रिकेट खेळण्यासही बंदी घालण्यात आली. आता आयसीसीच्या नवीन उपक्रमानंतर, विस्थापित अफगाण महिला क्रिकेटपटूंना आर्थिक मदत तसेच प्रशिक्षणासाठी जागतिक दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील.

आयसीसीचे अध्यक्ष जय शहांनीही या नवीन उपक्रमाबद्दल आनंद व्यक्त केला. त्यांनी सांगितले की, या उपक्रमामुळे महिला क्रिकेटपटूंमध्ये आशेचा एक नवा किरण येईल.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---